जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना व्हायरसचे 2 संशयित रुग्ण; प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी
जम्मूमध्ये दोन संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. हे दोघेही करोना पॉझिटिव्ह असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. हे दोन्ही रुग्ण प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून निघून गेले होते. परंतु, त्यांना परत बोलावण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
जम्मू-काश्मीरमधील 2 जणांना कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मूमध्ये (Jammu) दोन संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. हे दोघेही करोना पॉझिटिव्ह असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. हे दोन्ही रुग्ण प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून निघून गेले होते. परंतु, त्यांना परत बोलावण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.
देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने खबरदारी उपाय म्हणून जम्मू आणि सांबाच्या सर्व प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. जम्मूमध्ये 2 संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली होती. या दोघांची चाचणी पॉझिटिव्ह येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जम्मूमध्ये भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अयोध्येमध्ये दाखल; 7 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
दरम्यान, जम्मू सरकारने नागरिकांनी गर्दीची ठिकाणं, सभा किंवा संमेलनं टाळावीत, असा सल्ला दिला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि सांबा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी घोषित केली असून जम्मू-काश्मीरचे सर्व बायोमेट्रिक अटेन्डंटसवर बंदी घालण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे चीनसह इटलीमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीमध्ये एकाच दिवशी 49 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 4500 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 197 जणांचा कोरोना व्हायरमुळे मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 30 हून अधिक झाली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे.