Terrorist Attack On Army Vehicle: पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला; जवानांनी गोळीबाराला दिलं चोख प्रत्युत्तर

या घटनेनंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. सध्या त्याची संपूर्ण माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Army Vehicle Attacked By Terrorists प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI/Twitter)

Terrorist Attack On Army Vehicle: आज संध्याकाळी जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) मधील पुंछ (Poonch) जिल्ह्यातील खनेतरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार (Terrorist Attack On Army Vehicle) केला. ही कार लष्कराच्या कमांडिंग ऑफिसरची होती. या घटनेनंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. सध्या त्याची संपूर्ण माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातही लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये लष्कराचे चार जवान शहीद झाले होते तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यासाठी दहशतवादी जंगलात लपून बसले होते. (हेही वाचा - Army Vehicle Attacked By Terrorists: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यात 3 जवान शहीद)

लष्कराकडून शोधमोहीम सुरू -

या घटनेनंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि मंडी ते पूंछ या मार्गावरील वाहनांची ये-जा थांबवली. लष्कराच्या जवानाने दहशतवाद्यांच्या शोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांतील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये दहशतवादी अशा कारवाया करत असतात. या घटनेपूर्वी नोव्हेंबरमध्ये राजौरीतील बाजीमल भागात झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन कॅप्टन आणि तीन जवान शहीद झाले होते.