Army Vehicle Attacked By Terrorists: जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर झालेल्या हल्ल्यात 3 जवान शहीद
Army Vehicle Attacked By Terrorists प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI/Twitter)

Army Vehicle Attacked By Terrorists: गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी (Terrorists) लष्कराच्या वाहनावर (Army Vehicle) हल्ला केला. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. राजौरी-ठाणमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात दुपारी 3.30 च्या सुमारास वाहनांवर हल्ला झाला. बुफलियाजजवळील भागातून एक वाहन जवानांना घेऊन जात होते. या भागात बुधवारी रात्रीपासून दहशतवाद्यांविरोधात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे. यासंदर्भात सूत्रांनी माहिती दिली असून इंडिया टुडेने वृत्त प्रकाशित केलं आहे. जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

संरक्षण पीआरओने सांगितले की, या भागात कठोर गुप्तचरांच्या आधारे एक संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. बुधवारी रात्रीपासून  चकमक सुरू आहे. पुढील तपशीलांची खात्री केली जात आहे.  दरम्यान, दहशतवाद्याच्या हल्ल्यानंतर अतिरिक्त फौजा घटनास्थळी रवाना झाल्या. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात बुधवारी सशस्त्र पोलिस युनिटच्या कंपाऊंडमध्ये स्फोट झाल्यानंतर ही घटना घडली. (हेही वाचा -Parliament Security Breach Case: संसद सुरक्षा भंग प्रकरणात कर्नाटकमधून निवृत्त पोलीस उपअधीक्षकाचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात)

पहा व्हिडिओ - 

 

सुरनकोट भागात 19 आणि 20 डिसेंबरच्या मध्यरात्री झालेल्या स्फोटामुळे कंपाऊंडजवळ उभ्या असलेल्या काही वाहनांच्या खिडक्यांचे नुकसान झाले होते.