Ujjain Beaten Video: भाडेकरू महिलेला बेदम मारहाण, घरमालकासह कुटुंबातील 5 जणांना अटक, उज्जैन येथील घटना
मध्यप्रदेशातील उज्जैन मध्ये कोट मोहल्ला चौकात पॅथॉलॉडी लॅब चालवणाऱ्या महिलेला एका दुकान मालकाने त्याच्या कुटुंबासह मारहाण केली.
Ujjain Beaten Video: मध्यप्रदेशातील उज्जैन मध्ये कोट मोहल्ला चौकात पॅथॉलॉडी लॅब चालवणाऱ्या महिलेला एका दुकान मालकाने त्याच्या कुटुंबासह मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून महिलेला रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनुसार, दुकान मालक, पत्नी, मुलगा, सून आमि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा- पार्टी करत असताना अचानक तरुणाला गोळी लागली, जखमी अवस्थेत जमीनीवर पडला)
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरी फाटकजवळ इंडियन गेस्ट हाऊस हॉटेल येथे ही घटना घडली. हॉटेल चालवणाऱ्या आरोपी रियाझ आणि त्याचा मुलगा अक्रम यांनी पीडित अमरीनला तीन वर्षापूर्वी लाईप केअर पॅथॉलॉडी चालवण्यासाठी त्यांचे दुकान भाड्याने देऊन तीन वर्षाचा करार केला होता.रियाझ आणि अक्रम या महिलेने २४ जून २०२४ रोजी संपण्यापूर्वी त्यांचे दुकाने रिकामे करावे अशी त्यांची इच्छा होती. तरी महिलेने दोघांनाही अनेकदा सांगितले आहे की, करार संपण्यापूर्वी ती दुकान रिकामी करेल. या गोष्टीचा राग मनात धरत रियाझने कुटुंबासह महिलेला बेदम मारहाण केली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रियाझ यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यास सुरु केली. या मारहाणीत महिला जखमी झाली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आला. महिला पॅथॉलॉजी रुममध्ये बसलेली असते तेव्हा एक जण येऊन तिला धक्काबुक्की करतात. तसेच या महिलेवर पिता-पुत्र दोघांकडून शारिरीक अत्याचार केले जात आहेत. त्यादरम्यान रियाझची पत्नी, सून आणि आणखी एकजण येतात. आणि सर्वांनी मिळून महिलेला मारहाण केली. पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करत सर्वांना अटक करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 21, 2023 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

