Kanpur Crime News: पार्टी करत असताना अचानक तरुणाला गोळी लागली, जखमी अवस्थेत जमीनीवर पडला; घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

कानपूरमध्ये तरुणाला अचानक गोळी लागल्याची घटना घडली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या गोळीबारच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kanpur Crime News: पार्टी करत असताना अचानक तरुणाला गोळी लागली, जखमी अवस्थेत जमीनीवर पडला; घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल
Kanpur firing Video

Kanpur Crime News: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अचानक झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कानपूर जिल्ह्यातील भैरोनघाट पंपिंग स्टेशनजवळ काही तरुण मंडळींचा ग्रुप पार्टी करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्रुपमधील दुसऱ्या व्यक्तीने चुकून त्याच्यावर गोळीबार केल्याने एक व्यक्ती अचानक जमिनीवर पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अचानक झालेल्या गोळीबार तरुण गंभीर जखमी होवून जमीनीवर पडला.  पोलीस ठाण्यात या घटनेअंतर्गत कोणतीही तक्रार नोंदवली नाही अशी माहिती वृत्तांकडून मिळाली आहे. आरोपी आणि पीडितेची ओळख अद्याप पटलेली नाही. व्हिडिओमध्ये अपघाती बंदुकीची गोळी दिसत आहे, परंतु पीडित जखमी होण्याचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2023 04:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).