Andhra Pradesh: YSRCP कॉंग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांच्या घरावर TDP समर्थकांचा हल्ला, मुख्यमंत्री कडून राज्यपालांना हस्तक्षेपाची मागणी
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि युवाजन श्रमिका रिथू कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी राज्याचे राज्यपालांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
Andhra Pradesh: वायएसआरसीपी (YSRCP) कॉंग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांच्या घरांवर टीडीपी समर्थकांनी हल्ला केला. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि युवाजन श्रमिका रिथू कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी राज्याचे राज्यपालांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जगन रेड्डी यांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दावा केला. जगन रेड्डी यांनी राज्यपाल एस अब्दुल नझीर यांना हस्तक्षेप करण्यासाठी पत्र लिहलं. (हेही वाचा- एनडीए म्हणजे सुशासन; तिसर्यांदा पंतप्रधान होणार्या Narendra Modi यांनी सांगितला NDA चा नवा अर्थ)
सत्ताधारी तेलगू देसम पार्टी (टीडीपी) कडून त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले. कृष्णा जिल्ह्यातील माजी मंत्री कोडाली श्री व्यंकटेश्वर आणि माजी आमदार वल्लभनेनी वामसी यांच्या घरांवर हल्लेखोरांच्या गटांनी हल्ला केला. विजयवाडा येथील वल्लभनेनी वामली यांच्या घरांवर हल्लेखोरांनी दगडफेक केला आहे. घरासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्यांचे नुकसान देखील केले आहे. काही तरुणांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर काही जण हल्लेखोर कारवर चढून होते. टीडीपीचे कार्यकर्त्ये वामसीला धमकी देत होते. त्याला सोडणार नाही असा इशारा दिला
जनग रेड्डी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. कार्यकर्त्यांच्या घरांवर होणाऱ्या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जगन यांनी सांगितले की, '' सरकार बनवण्याआधीच, टीडीपी समर्थकांचा धुमाकुळ सुरु आहे. सरकारी मालमत्तांची तोडफोड केली जात आहे. YSRCPचे नेते आणि कार्यकर्ते असुरक्षित राहिले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून राखलेली शांतता पूर्णपणे भंग पावली आहे."