Tamil Nadu Bus Accident: कुन्नूरजवळील घाटात पर्यटकांची बस कोसळली, ६ जण दगावले; अनेकजण जखमी
कुन्नूरजवळील मारापलमजवळ शनिवारी किमान 50 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी पर्यटक बस पलटी झाली.
Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूतील कुन्नूरजवळील मारापलमजवळ शनिवारी किमान 50 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी पर्यटक बस पलटी झाली. 100 फूट खोल दरीत कोसळली. वृत्तानुसार, या दुर्घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले आहेत. बस चालकाचे नियत्रंण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली, आणि एका मोठ्या दगडाला आढळली. चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अधिकाऱ्यांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. स्थानिक अहवालानुसार मृतांची संख्या सहा ते आठ दरम्यान होती.
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement