Tamil Nadu Bus Accident: कुन्नूरजवळील घाटात पर्यटकांची बस कोसळली, ६ जण दगावले; अनेकजण जखमी

कुन्नूरजवळील मारापलमजवळ शनिवारी किमान 50 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी पर्यटक बस पलटी झाली.

Tamil Nadu Bus Accident: कुन्नूरजवळील घाटात पर्यटकांची बस कोसळली, ६ जण दगावले; अनेकजण जखमी
tamilnadu bus accident

Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूतील कुन्नूरजवळील मारापलमजवळ शनिवारी किमान 50 प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी पर्यटक बस पलटी झाली. 100 फूट खोल दरीत कोसळली. वृत्तानुसार, या दुर्घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले आहेत. बस चालकाचे नियत्रंण सुटल्याने बस थेट दरीत कोसळली, आणि एका मोठ्या दगडाला आढळली. चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले. अपघाताच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून अधिकाऱ्यांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. स्थानिक अहवालानुसार मृतांची संख्या सहा ते आठ दरम्यान होती.

(The above story first appeared on LatestLY on Oct 01, 2023 07:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).