Indian Embassy Official Death: वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, यू. एस. सीक्रेट सर्व्हिसकडून तपास सुरु
वॉशिंग्टन येथील मिशन परिसरात अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला. स्थानिक पोलिस आणि गुप्त सेवा या घटनेची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणाचा तपास अमेरिकन कायदा अंमलबजावणी संस्था आणि यू एस. हे सीक्रेट सर्व्हिसद्वारे केले जात आहे.
Indian Embassy Official Death: वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासातील एका अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टन येथील मिशन परिसरात अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला. स्थानिक पोलिस आणि गुप्त सेवा या घटनेची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणाचा तपास अमेरिकन कायदा अंमलबजावणी संस्था आणि यू एस. हे सीक्रेट सर्व्हिसद्वारे केले जात आहे. प्राथमिक माहितीनुसार,या प्रकणात आत्महत्येसह अनेक शक्यता तपासल्या जात आहे. (हेही वाचा- तब्बल 18 तासांच्या कामानंतर बाईकवर डुलकी घेताना डिलिव्हरी एजंटचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ)
भारतीय दुतावासाने या घटनेबाबत तीव्र दु: ख व्यक्त केले आहे. त्याने X वर या संदर्भात पोस्ट लिहली आहे. भारतीय दूतावासाने पुष्टी केली की 18 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दूतावासाने सांगितले की, "आम्ही सर्व संबंधित एजन्सी आणि कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत जेणेकरून अधिकाऱ्याचे पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठवण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.
तपासात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेच्या सर्व पैलूंची अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. कुटुंबिचा देखील लवकच चौकशी केली जाईल. पुढील तपासांची प्रतिक्षा आहे. तपासातून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत, मात्र तपास यंत्रणा अत्यंत सावधगिरीने या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत.