Supreme Court Started RTI Portal: सर्वोच्च न्यायालयाचे 'आरटीआय पोर्टल' सुरू; न्यायालयाशी संबंधित माहिती मिळण्यास होणार मदत
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच ऑनलाइन आरटीआय पोर्टल (RTI Portal) सुरू केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून माहिती मिळविण्यासाठी, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो.
Supreme Court Started RTI Portal: सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) माहिती मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. गुरुवारपासून आरटीआय अर्ज भरण्याचे पोर्टल सुरू झाले. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हे न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयात माहिती मिळणे सोपे झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच ऑनलाइन आरटीआय पोर्टल (RTI Portal) सुरू केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून माहिती मिळविण्यासाठी, माहिती अधिकार कायद्याअंतर्गत या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. हे पोर्टल आजपासून काम करण्यास सुरुवात करेल. CJI DY चंद्रचूड म्हणाले की, ऑनलाइन RTI पोर्टल आजपासून पूर्णपणे कार्यान्वित होईल.
या पोर्टलचे नाव registry.sci.gov.in/rti_app आहे. CJI चंद्रचूड म्हणाले की, या पोर्टलमुळे लोकांना सर्वोच्च न्यायालयाची माहिती मिळणे सोपे होईल. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून माहिती मिळविण्यासाठी पोस्टाद्वारे आरटीआय दाखल करावा लागत होता. सरन्यायाधीशांनी आता ते ऑनलाइन करण्याच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. (हेही वाचा - PM Modi: जाणून घ्या पंतप्रधान मोदींची लाईफस्टाईल, RTI मधून आश्चर्यचकित करणारी माहिती पुढे)
दरम्यान, 13 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीशांचे कार्यालय 'सार्वजनिक कार्यालय' म्हणून घोषित केले आहे. सुप्रीम कोर्ट हे देखील माहिती अधिकार कायदा, 2005 अंतर्गत सार्वजनिक कार्यालय आहे. त्यामुळे नागरिक त्याच्या कामकाजाशी संबंधित माहिती घेऊ शकतात. 2019 मध्ये, न्यायालयाने असे ठासून सांगितले होते की, लोकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळेल हे निर्विवाद आहे. एक दिवस सरन्यायाधीशांचे कार्यालयही या कायद्याच्या कक्षेत येईल. (हेही वाचा - Online RTI: केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय, विभागांमध्ये एकाच ठिकाणी करा माहिती अधिकार अर्ज)
तथापी, या पोर्टलद्वारे नागरिक अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्वप्रथम, अर्जदाराला त्यात त्याचा लॉगिन आयडी तयार करावा लागेल. त्यानंतर जी माहिती मागवली जाते ती फॉर्ममध्ये भरावी लागेल. नंतर 10 रुपये शुल्क ऑनलाइन भरावे लागेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)