Student Suicide Case: एकटेपणाला कंटाळून तरूणीने सुसाईट नोट लिहून केली आत्महत्या, कोलकत्ता येथील घटना
नादियातील नबद्वीप येथील एका 18 वर्षीय तरुणीने कोलकाता येथील पिकनिक गार्डन परिसरात तिच्या भाड्याच्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Student Suicide Case: नादियातील नबद्वीप येथील एका 18 वर्षीय तरुणीने कोलकाता येथील पिकनिक गार्डन परिसरात तिच्या भाड्याच्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी तीने आत्महत्या केले आहे. इप्सिता घोष असं मृत तरुणीचे नाव आहे, कोलकत्ता शहरातील एका प्रीमियर इन्स्टिट्यूटमध्ये आठ महिने एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. घटनास्थळी पोलीसांना एक सुसाइड नोट सापडली, ज्यामध्ये तिने टोकाचे पाऊल उचलण्यामागे एकटेपणा हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. तीनं भाड्याच्या घरात आत्महत्या केली.
सुसाईट नोट मध्ये लिहले होते की, "कदाचित अत्यंत स्पर्धात्मक वातावरणामुळे तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. तिला विश्वास ठेवण्यासाठी कोणताही मित्र सापडला नाही आणि कदाचित तिला एकटे वाटले असेल. तिच्या सुसाईड नोटच्या शेवटी तिने लिहिले की तिच्या निर्णयासाठी कोणीही जबाबदार नाही. ", तिलजाला पीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 च्या सुमारास मुलगी पहिल्या मजल्यावरील खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने सीएनएमसी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2023 01:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

