Theft Caught on Camera in Jaipur: लग्न समारंभात अंदाज घेतला अन् सोन्यांच्या दागिन्यांची बॅग पळवली, 14 वर्षाच्या मुलाचा कारनामा CCTV कैद (Watch Video)

लग्न सोहळ्यात वस्तूंची किंवा पैशांची चोरी झालेल्या अनेक घटना आजवर पाहिल्या आहेत. राजस्थान येथील जयपूर शहरातील हयात हॉटेलमध्ये चक्क १४ वर्षाच्या मुलाने चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Hotel Hyatt Regency stolen bag Photo Credit P TWITTER

Theft Caught on Camera in Jaipur: लग्न समारंभात चोरी होणे ही घटना आता काही सामान्य राहिली नाही. लग्न सोहळ्यात वस्तूंची किंवा पैशांची चोरी झालेल्या अनेक घटना आजवर पाहिल्या आहेत. राजस्थान येथील जयपूर शहरातील हयात हॉटेलमध्ये चक्क 14 वर्षाच्या मुलाने चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाने तब्बल 1.50 कोटी रुपयांची आणि मौल्यवान वस्तूंच्या बॅगेची चोरी केली. ही घटना लग्न सोहळा सुरु असताना घडली. चोरी केल्याची घटना हॉलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  (हेही वाचा-बदलापूर येथे वॉच शोरुममध्ये चोरी, 23 लाखांचे 300 घड्याळ लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील एक कपल डेस्टिनेश वेडिंगसाठी जयपूर येथील हयात हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये लग्न समारंभ सुरु असताना, एका 14 वर्षाच्या मुलाने पैश्यांनी आणि सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग पळवली. ही बॅग नवऱ्या मुलाच्या आईची होती. चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. अवघ्या एका मिनिटात मुलाने चोरी केल्याचे व्हिडिओत दिसले.

चोरीच्या घटनेचा व्हिडिओ 

चोरी केल्याच्या काही तासांनंतर सोन्यांच्या दागिन्यांची बॅग कुणीतरी पळवल्याच लक्ष्यात आले. चोरीच्या घटनेनंतर हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मंडपातून चोरली झालेल्या बॅगेत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, एकूण अंदाजे 1.44 कोटी रुपये होते. पोलिसांनी सांगितले की, संशयित व्यक्ती मुलासोबत लग्न मिरवणूकीतून हॉलमध्ये प्रवेश केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif