Sensex Opening Bell on Budget Day: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार हिरव्या चिन्हावर उघडला; सेन्सेक्स 200 अंकांनी वधारला, तर निफ्टीने 24500 पार
याआधी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सकारात्मक व्यवहार करत असल्याचे दिसत होते. सकाळी 9.36 वाजता सेन्सेक्स 28.52 (0.03%) अंकांच्या वाढीसह 80,555.17 वर व्यवहार करत होता.
Sensex Opening Bell on Budget Day: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी (Union Budget 2024) देशांतर्गत शेअर बाजारात (Share Market) हिरव्या चिन्हावर व्यवहार सुरू झाले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक सकारात्मक व्यवहार करत असल्याचे दिसत होते. सकाळी 9.36 वाजता सेन्सेक्स 28.52 (0.03%) अंकांच्या वाढीसह 80,555.17 वर व्यवहार करत होता.
दुसरीकडे, निफ्टी 17.41 (0.07%) अंकांच्या वाढीसह 24,526.65 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्सने 200 अंकांची वाढ दाखवली तर निफ्टीने 22550 चा टप्पा ओलांडला. सकाळी बँकिंग, मेटल, पॉवर आणि एफएमसीजी शेअर्संमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. (हेही वाचा - Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सादर करणार अर्थसंकल्प)
बाजारात लार्जकॅप समभागांसह मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये संमिश्र व्यापार होताना दिसत आहे. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 73 अंक किंवा 0.13 टक्क्यांच्या वाढीसह 56,698 वर आहे आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 57 अंक किंवा 0.31 टक्क्यांच्या वाढीसह 18,505 वर आहे. (हेही वाचा- सरकारी उपाययोजना आणि RBI च्या हस्तक्षेपामुळे 5.4% वर राहिली, आर्थिक पाहणी अहवालात केंद्राचा दावा)
अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी, सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. बीएसईचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 102.57 अंकांनी घसरून 80,502.08 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निर्देशांक निफ्टी 21.65 अंकांनी घसरून 24,509.25 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीचे हे सलग दुसरे सत्र ठरले. याआधी शुक्रवारीही दोन्ही निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते.