मध्य प्रदेश: चेटकीण समजून मुलाने केली 65 वर्षीय आईची हत्या; आरोपीला अटक

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन (Khargone) जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने आपल्या आईला चेटकीण (Witchcraft) समजून चाकूने वार करत हत्या केली आहे.

मध्य प्रदेश: चेटकीण समजून मुलाने केली 65 वर्षीय आईची हत्या; आरोपीला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खरगोन (Khargone) जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाने आपल्या आईला चेटकीण (Witchcraft) समजून चाकूने वार करत हत्या केली आहे. या घटनेत आईचा जागेवरचं मृत्यू झाला. विशेष म्हणजे आरोपी हत्येनंतर बराच वेळ आपल्या आईबरोबर बसला. त्यानंतर गावकऱ्यांची त्याचे व्हिडिओ बनवले. आईवर चेटकीणीची सावली असून ती जादूटोणा करत असल्याचा आरोप मुलाने केला आहे. या कारणामुळे आपण आईची हत्या केल्याचंही त्याने कबूल केलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, खरगोन जिल्हा मुख्यालयापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या महेश्वरच्या करौली गावात 45 वर्षांच्या गणपतने जादूटोण्याच्या भीतीने त्याच्या आईची निर्दयपणे हत्या केली. यात 65 वर्षीय आई काला बाई यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली आहे. (हेही वाचा - Uttar Pradesh Crime: मायलेकाच्या नात्याला काळिमा! उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूरमध्ये मुलाने जन्मदात्या आईलाच जिवंत पेटवून दिले)

दरम्यान, मुलाने आईच्या हत्येचा कट आधीच रचला होता. आईला ठार करण्यासाठी त्याने चाकू विकत घेतला होता. या चाकूने वार करून त्याने आईची हत्या केली. आईला ठार मारल्यानंतर मुलगा रक्ताने भरलेला चाकू घेऊन बसला होता. या घटनेचा व्हिडिओ गावातील नागरिकांनी शूट केला आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली. (हेही वाचा - Bengaluru: 24 हजार रुपयांचे भाडे न मिळल्याने महिलेकडून भाडेकरुवर चाकू हल्ला)

महेश्वर पोलिस स्टेशनचे प्रभारी पीके मुवेल यांनी सांगितले की, रविवारी रात्री करौली गावात एका मुलाने चाकूने आपल्या आईवर चाकूने वार केले. त्यानंतर आईला जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, त्या महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. मुलाचा असा विश्वास होता की, त्याची आई चेटकीण असून ती जादूटोणा करत होती. मुलाला आईकडून ठार मारण्याची भीती होती, म्हणून मुलानेचं आईला संपवले, असंही मुवेल यांनी सांगितलं.

(The above story first appeared on LatestLY on Nov 03, 2020 09:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).