Snowfall in Jammu-Kashmir: श्रीनगरमधील रस्ते-रेल्वे वाहतूक ठप्प आणि विमानसेवा बंद, महामार्गावर 2000 लोक

जोरदार बर्फवृष्टीमुळे भारताच्या उत्तरेकडील भागात जनजीवन ठप्प झाले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली आहेत. शुक्रवारी दुपारपासून जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली, ती शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती.

Photo Credit- X

Snowfall in Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) सतत बर्फवृष्टी होत आहे. पीर पंजाल बोगदा ते श्रीनगर (Srinagar) शहरादरम्यान रस्त्यावर शेकडो वाहने अडकली आहेत. जोरदार हिमवृष्टी(Snowfall) आणि शून्याखाली गेलेल्या तापमानामुळे राष्ट्रीय महामार्गावर बर्फाची दाट चादर पसरली आहे. रस्त्यावर अडकलेली वाहने बाहेर(Roads closed) काढण्यासाठी स्थानिक अधिकारी जोरदार प्रयत्न करत होते, मात्र बर्फवृष्टीमुळे अनेक तास वाहने सतत अडकून पडली आहेत.(Himachal Pradesh Weather: कुल्लू येथून 5 हजार पर्यटकांची सुटका; श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी, महामार्ग बंद)

रस्ते बंद, वाहतूक कोंडी

राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या वाहनांची सुटका करण्यासाठी कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातून यंत्रणा आणि पोलिस अधिकारी दाखल झाले आहेत. रात्रभर काम सुरू होते. मात्र, शनिवार सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही. श्रीनगर शहर आणि बडगाम, गंदरबल, बांदीपोरा, बारामुल्ला, कुपवाडा, पुलवामा, अनंतनाग, कुलगाम आणि शोपियान यांसारख्या इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सकाळी बर्फ हटवण्याची यंत्रे रवाना करण्यात आली.

श्रीनगरमध्ये वीजपुरवठा खंडित

श्रीनगर शहरातील काही भाग वगळता वीजपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात आला आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. ट्रान्समिशन लाइन तुटल्या आणि पॉवर ग्रीड्स खंडित झाल्या आहेत. मात्र, या बर्फवृष्टीने स्थानिक लोक चांगलेच खूश आहेत.(Srinagar Airport Update: श्रीनगर मधील खराब वातावरणामुळे सार्‍या फ्लाईट्स रद्द)

दहा इंचांपेक्षा जास्त बर्फ

श्रीनगर शहर आणि आजूबाजूच्या परिसरात हंगामातील ही पहिलीच बर्फवृष्टी होती. बर्फवृष्टीमुळे घाटीत सुट्टी घालवणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावरही आनंद पसरला आहे. गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि इतर पर्यटन स्थळांवर सुमारे 10 इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली आहे. येत्या २४ तासांत आणखी बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

रेल्वे सेवा रद्द

रुळांवर मोठ्या प्रमाणात बर्फ साचल्यामुळे बनिहाल-बारामुल्ला सेक्शनवर शनिवारी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. रुळांवरून बर्फ हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार, बनिहाल-बारामुल्ला सेक्शनवरील रेल्वे सेवा शनिवारी दुपारी 1 वाजेपर्यंत बंद करण्यात आली. रेल्वेची वाहतूक सुरू होण्यापूर्वी रुळावर डब्ल्यूडीएम इंजिन असलेले 'स्नो कटर' चालवले जाईल.

उड्डाणे रद्द

खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. श्रीनगर विमानतळ प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी अपडेटसाठी त्यांच्या एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा करावा. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि तुमच्या समजुतीचे कौतुक करतो, अशी माफिही त्यांनी मागितली.

2000 हून अधिक लोक बर्फवृष्टीमध्ये अडकले

श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे आदेश जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. बर्फवृष्टीमुळे महामार्गावर अनेक वाहने अडकली. हा महामार्ग जम्मू- काश्मिरला उर्वरित देशाशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. बर्फवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन्ही दिशेला अडकलेली वाहने संथगतीने पुढे सरकत असून आवश्यक तेथे मदत दिली जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now