Ahmedabad-Vadodara Express Highway Accident: अहमदाबाद- वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर लक्झरी बसचा भीषण अपघात, सहा जणांनी गमावले प्राण
हा अपघात इतका भंयकर होता की, यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
Ahmedabad-Vadodara Express Highway Accident: अहमदाबाद - वडोदरा एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भंयकर होता की, यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. आनंदजवळ पार्क केलेल्या लक्झरी बसला (Bus) एका भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरु झाले. (हेही वाचा-चिपळूण येथील शेलडी धरणात 32 वर्षांचा तरुण वाहून गेला (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे प्रवाशांनी भरलेली लक्झरी बस काही कामानिमित्त रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आली होती. परंतु समोरून येणाऱ्या ट्रकरचा एक टायर फुटल्याने ट्रक उभ्या असलेल्या लक्झरी बसला धडकली. बस रस्ता दुभाजकावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की प्रवाशी चिरडले गेले. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना, अग्निशनम दलाला देण्यात आली. घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे भरपूर नुकसान झाले आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असे पोलिस अधिकाऱ्यांनी माहिती दिली. अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या अपघाताची सध्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. सध्या मृतांची ओळख आणि घटनेच्या परिस्थितीबाबत प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे.