Merath Shocker: मोबाईल चार्ज होत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग, चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू, मेरठ येथील घटना
मेरठच्या पल्लवपूरम भागातील एका घराला मोबाईल चार्ज होत असताना चार्ज होत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Merath Shocker: मेरठच्या पल्लवपूरम भागातील एका घराला मोबाईल (Mobile) चार्ज होत असताना चार्ज होत असताना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाला आहे तर त्यांचे पालक जखमी झाले आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. ही घटना शहरातील जनता कॉलनीत जोनी नावाच्या व्यक्तीच्या घरात घडली आहे. (हेही वाचा- मुंबई मध्ये Punjabi Ghasitaram Halwai च्या फॅक्टरीत 'बालकामगारा'चा लिफ्ट दुर्घटनेत मृत्यू;
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी जनता कॉलनीत एका घरात मोबाईल चार्ज होत असताना शॉर्ट सर्किट झाला. या घटनेत चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्किटमुळे भीषण स्फोट झाला.यात जोनी, त्याची पत्नी बबिता आणि चार मुले सारिका (10), निहारिका (8), संस्कार उर्फ गोलू (6) आणि कालू (4) गंभीरपणे भाजले.त्यानंतर सर्वांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले जेथे रात्री उशिरा निहारिका आणि गोलूचा मृत्यू झाला तर रविवारी सकाळी सारिका आणि कालू यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती नोंद पोलिसांनी केली आहे. जॉनची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु बबिताची प्रकृती चिंताजनक आहे. तिला दिल्लीतील एम्समध्ये (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) रेफर करण्यात आले आहे. जॉनीने सांगितले की, निहारिका, गोलू आणि कालू मोबाईलवर गेम खेळत होते आणि यादरम्यान मोबाईल चार्जही होत होता. यावेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि भीषण घटना घडली.