Madya Pradesh Rape: धक्कादायक! मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार
देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. यातच मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे.
देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे (Rape) सत्र थांबायला तयार नाही. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. यातच मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या ग्वाल्हेर (Gwalior) परिसरात एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याची घटना घडली आहे. इंदरगंज पोलीस ठाण्यात (Indarganj Police Station) आरोपीसह कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे, असे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदरगंज पोलीस अधिक तपास करत आहेत.
पीडित महिला कुलैथ येथील रहिवाशी असून ती नोकरीच्या शोधात आहे. दरम्यान, नोकरीचे आमिष दाखवत एका व्यक्तीने तिला बहोडापूर येथे कारमध्ये बसवले. परंतु, कार सुरु होताच आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी महिलेने कार चालकाला गाडी थांबवण्याची विनंती केली. मात्र, त्यानेही आरोपी साथ दिल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पीडित महिलेने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर इंदरगंज पोलीस ठाणे गाठले. तसेच तिच्यासोबत घडलेला सर्वप्रकार पोलिसांना सांगितला. महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीसह त्याच्या कार चालकावरही गुन्हा दाखल केला आहे. हे देखील वाचा- Tamil Nadu: गरोदर पत्नीवर सेक्ससाठी करायचा जबरदस्ती; वैतागलेल्या महिलेने नवऱ्याचा असा काढला काटा
याप्रकरणी रामबाबू गुर्जर याच्यासह त्याच्या चालकालाही अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक विजय भदौरिया याप्रकरणांचा तपास करत आहेत. दरम्यान, घडलेला सर्वप्रकार धक्कादायक असून या घटनेवर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र टाईम्सने वृत्त दिले आहे.