Lucknow Shocker: उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना, 10 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार, मुख्य आरोपी फरार

बंथारा भागात एका १० वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, आरोपींचा शोध घेतला.

Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Lucknow Shocker:  उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. बंथारा भागात एका 10 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, आरोपींचा शोध घेतला. या घटनेचा मुख्य आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. तरी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा-  टिंडर डेटवर आयएएस इच्छुकाची लाखोंची फसवणूक; धमकावून 1.25 लाखांचे बिल वसूल, दिल्लीतील कॅफेमधून तरुणांच्या लुबाडणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश)

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे अपहरण झाल्यानंतर तीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवला आहे. आईने पोलिसांना सांगितले की, मुलीने कॉल केला पंरतु ती काही घरी परतली नाही. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही मोबाईलवर संपर्क न झाल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले मात्र तिचा शोध लागला नाही. पीडितेच्या आईने पुढे सांगितले की, मुलीला गावात राहणारा एक तरुण नेहमी कॉल करायचा आणि तिच्यासोबत अनुचित संभाषण करायचा.

कुटुंबियांनी तरुणाच्या घरी भेट दिली मात्र त्याच्या कुटुंबियांनी मुलीबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. रात्री ११.१५च्या सुमारास पोलिस आणि काही गावकरी आरोपीच्या घरात घुसले. घराच्या एका खोलीत मुलीला कोंडून ठेवले होते. मुलीचे हात पाय कपड्याने बांधलेले होते. त्याच वेळी आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

मुलीने पोलिसांना सांगितले की, जेव्हा ती कामानिमित्त घराबाहेर पडली तेव्हा आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी तोंड दाबून तिला जबरदस्तीने घरी नेले. त्यांनी तिचा मोबाईल हिसकावून तलावात फेकला. त्यानंतर आरोपीने घरातील एका खोलीत कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी या घटनेअंतर्गत तिघांवर अपहरणाचा आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.