चहा प्रेमींना थक्क करेल ऐवढी 'या' चहाची किंमत
तर त्याची किंमत ऐकून थक्क व्हायला होईल ऐवढी या चहाची किंमत आहे.
प्रत्येक चहा प्रेमींना विविध प्रकारच्या चहाची चव एकदा तरी घ्यावी असे वाटते. तसेच चहामध्ये ब्लॅक टी, लेमन टी, आसामी चहा आदी प्रकाराच्या चहाची उपलब्धता बाजारात सहज होते. मात्र आता बाजारात एका नवीन चहाचा प्रकार पाहायला मिळत आहे. तर त्याची किंमत ऐकून थक्क व्हायला होईल ऐवढी या चहाची किंमत आहे.
अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यामध्ये या चहाचे उत्पादन होते. तर या चहाचा रंग जांभळा असून त्याची किंमत 24,501 रुपये ऐवढी आहे. संशोधन करणाऱ्या एका कंपनीने या चहावर संशोधन केले असता त्याचा ऐतिहासिक संबंध असल्याचे त्यांना आढळून आले आहे. यापूर्वी या चहाचे उत्पादन केनिया या देशात व्हायचे. त्यानंतर आसामच्या प्रवासानंतर आता अरुणाचल प्रदेशात याचे उत्पादन घेतले जाते. तसेच उत्तम दर्जाच्या चहामध्ये याचा समावेश होतो.
या चहाची किंमत खूप जास्त असली तरीही कॅन्सर आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजार बरे होण्यास मदत होते.