Panjab Robbery: डॉक्टरांच्या घरातून 6 लाख आणि सोन्याच्या दागिन्यांची चोरी, एकास अटक; पंजाबच्या चंदीगड येथील घटना
याप्रकरणी डॉक्टरांनी 26 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र तेव्हापासून आरोपी फरार असून पोलीस त्याच्या शोधात होती.
पंजाब (Panjab) चंडीगड (Chandigarh) येथील एका डॉक्टरांच्या घरातून 6 लाखांची चोरी (Robbery) केल्याप्रकरणी सुरक्षारक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी डॉक्टरांनी 26 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र तेव्हापासून आरोपी फरार असून पोलीस त्याच्या शोधात होती. दरम्यान, अखेर पोलिसांना शनिवारी आरोपीला पकडण्यात यश आले आहे. याप्रकरणी त्याची कसून चौकशी केली जात आहे. या चोरीच्या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे.
रिंकू खान असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने 26 सप्टेंबरला डॉक्टरांच्या घरी गेला आणि त्यांच्या पत्नीच्या चहात गुंगीचे औषध मिसळले. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपीने सीसीटीव्ही कॅमरे बंद करत घरातील रोख 6. 12 लाख रोख रक्कम, 3 सोनसाखळी आणि दीड लाखांचे एफडी प्रमाणपत्र चोरून पळून गेला. महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा डॉक्टर शहराबाहेर होते, अशी माहिती मिळत आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh: केंद्रीय मंत्री Ajay Mishra यांचा मुलगा Ashish Mishra ने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप; 3 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
ही घटना उघडकीस आल्यावर डॉक्टरांनी चंदिगडमधील सेक्टर 19 पोलीस ठाण्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. चोरीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीने त्याचा मोबाईल फोन बंद केला होता, मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 4 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.