20 कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या पेटीएमच्या सचिवसह नवऱ्याला अटक

पेटीएमचे मालक विजय शेखर शर्मा यांची खासगी माहिती चोरुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे प्रकरण समोर आले आहे.

फोटो सौजन्य- गुगल

पेटीएमचे मालक विजय शेखर शर्मा यांची खासगी माहिती चोरुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करणारे प्रकरण समोर आले आहे. तसेच या प्रकरणी पेटीएमच्या तीन कर्मचाऱ्यांनी ही माहिती चोरुन ती सर्वत्र पसरवू असे सांगून धमक्या देण्यात येत होत्या. तर या प्रकरणी एक महिलासुद्धा सामील असून ती विजय शर्मा याची सचिव असल्याचे उघडकीस आले आहे.

विजय शर्मा 20 सप्टेंबर रोजी जपानला काही कामासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरुन धमकी देणारा फोन आला होता. तसेच फोन आलेल्या नंबरवरील व्यक्तीने आपल्याकडे पेटीएमच्या कंपनीची गुप्त माहिती असल्याचे सांगून 20 कोटींच्या खंडणीची मागणी केली. ही सर्व माहिती त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांकडूनच मिळाली असल्याचे शर्मा यांना सांगण्यात आले. त्यामुळे शर्मा यांनी गौतम बुद्ध नगर पोलिसात या खंडणीसाठी आलेल्या फोनची तक्रार पोलिसांत नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शर्मा यांची सचिव सोनिया धवन आणि तिच्या नवऱ्याला अटक केली आहे.

तसेच या प्रकरणातील देवेंद्र कुमारला ही अटक केली असून चौथ्या आरोपीने पळ काढला आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर आरोपी सोनिया ही शर्मा यांच्याकडे गेली 10 वर्षे काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये भारताने कोणाला केले लक्ष्य? परराष्ट्र सचिवांनी दिली माहिती

Gaganyaan Mission: पाकिस्तानसोबत तणाव वाढला; आयएएफने गगनयान अंतराळवीर अजित कृष्णन यांना परत बोलावले

ITR-3 Form for AY 2025-26: आयटीआर-3 फॉर्म कोणी भरावा? त्यासाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अंतिम मुदत घ्या जाणून

Advertisement

Illinois Tech to Set Up Campus in Mumbai: शिकागोच्या इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला भारतात कॅम्पस स्थापन करण्यासाठी UGC ची मान्यता; ठरले पहिले अमेरिकन विद्यापीठ, मुंबईमध्ये सुरु करणार अभ्यासक्रम

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement