Indore Accident: इंदौर येथे ट्रॅक्टर-बाईकच्या धडकेत शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू, 2 जण जखमी

मध्य प्रदेशातील इंदौर येथे ट्रॅक्टरच्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र जखमी झाले

Accident (PC - File Photo)

Indore Accident: मध्य प्रदेशातील इंदौर (Indore) येथे ट्रॅक्टरच्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याचे दोन मित्र जखमी झाले. या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी या घटनेची  माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. घटनास्थळावरून ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे. (हेही वाचा- वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनाची रिक्षाला धडक, चालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, हातोड भागात एका शाळकरी विद्यार्थ्याचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाला. शुक्रवारी ही घटना पालिया गावात घडली. राज असं अपघातात मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दोन मित्र या अपघातात जखमी झाले. पोलिसांनी मित्रांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टरचालक विष्णू विरुध्दात गुन्हा दाखल केला. राज आणि त्याचे मित्र दुचाकीवर जात असताना विरुध्द दिशेने येणाऱ्या टॅक्टरने त्यांना धडक दिली. राज या अपघातात जखमी झाला त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी राजला मृत घोषित केले.

राजच्या मित्राने या घटनेअंतर्गत हातोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या घटनेअंतर्गत आरोपी चालकावर गुन्हा दाखल करून घेतला आहे. चालकावर बेकारदेशीर वाहन चालवणे असा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आरोपीच्या शोधात आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.