Delhi News: वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनाची रिक्षाला धडक, चालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

दिल्लीत एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या कारने ई- रिक्षाला धडक दिली.

Delhi News: वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या वाहनाची रिक्षाला धडक, चालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Delhi News:  दिल्लीत एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या कारने ई- रिक्षाला धडक दिली. या अपघातात ई- रिक्षा चालक गंभीर जखणी झाला त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमित झा असं मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. दिल्लीतील मायापूरी परिसरात ही घटना घडली. या अपघातानंतर आरोपी ट्रॅफिक पोलिस अधिकारी मुकेश कुमार यांच्याविरुध्दात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2023 09:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).