SBI Clerk Recruitment 2021: एसबीआयमध्ये ज्युनियर असोसिएट पदांसाठी नोकर भरती, उमेदवारांना sbi.co.in वर करता येईल अर्ज
तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे दिली असून जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर त्वरीत करा.
SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ज्युनियर असोसिएट पदासाठी नोकर भरती करण्यात येत आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे दिली असून जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर त्वरीत करा. ज्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या. उमेदवारांनी फॉर्म भरताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की, त्यामध्ये कोणतीही चुक झाल्यास तो स्विकारला जाणार नाही. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी तो नीट वाचा. (DRDO Apprentice Recruitment 2021: डीआरडीओ मध्ये अपरेंटिसच्या 79 पदांसाठी नोकर भरती, 'या' पद्धतीने करा अर्ज)
ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया 27 एप्रिल पासूनच सुरु झाली होती. ज्युनियर असोसिएट पदासाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी मधून कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन डिग्री घेतलेली असावी. तर उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2021 रोजी 10 वर्षांहून अधिक आणि 28 वर्षाहून कमी असावे. या पदासाठी अर्ज करण्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी या डायरेक्ट लिंकवर क्लिक करा.
या डायरेक्ट लिंकवर क्लिक केल्यास ऑनलाईन अर्ज प्राप्त होईल.
एसबीआयने ज्युनियर असोसिएटच्या पदासाठी रजिस्ट्रेशन करणाऱ्या उमेदवारांनी नोंदणी आणि शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरावी असे सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त लक्षात असू द्या की, उमेदवाराने निवडलेल्या केंद्रा शिवाय एसबीआयकडून अन्य केंद्र सुद्धा देऊ शकते. त्यामुळे याबद्दल अर्ज भरण्यापूर्वी विचार करा.
ज्युनियर असोसिएट पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्लूएस श्रेणी संबंधित उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्लूडी उमेदवारांना रजिस्ट्रेशनसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही आहे. या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी असे सांगण्यात आले आहे.