Sarkari Naukri: SSC 2019-20 मध्ये 1 लाखापेक्षा अधिक नोकर भरती

कारण स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे 2019-20 च्या वर्षासाठी 1 लाखापेक्षा अधिक पदावर नोकर भरती करण्यात येणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असल्यास ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण स्टाफ सिलेक्शन कमिशन येथे 2019-20 च्या वर्षासाठी 1 लाखापेक्षा अधिक पदावर नोकर भरती करण्यात येणार आहे. देशात वाढती बेरोजगारी पाहता नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही खुशखबर आहे. सरकारकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, केंद्र सरकारच्या अधीन विभागात किती रिक्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबत असे सांगितले की, 6.83 लाखांपेक्षा अधिक जागांवर भरती करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारमध्ये स्वीकृत पदांची संख्या 38,02,779 असून मार्च 2018 पर्यंत 31 लाखांपेक्षा अधिक पदांवर नोकर भरती करण्यात आली. तर आता सध्या 6 लाखांपेक्षा अधिक जागांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. मात्र कोणत्या जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच सहा लाख पदांसाठी नोकर भरती कंपनीकडून सुरु करण्यात आली आहे.(दहावी पास उमेदवारांना भारतीय रेल्वेत नोकरीची संधी ! पहा कसा आणि कुठे कराल अर्ज)

तसेच भारतीय किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असणारे विभाग म्हणजे भारतीय नौसेना दल (Indian Navy). या दलातील 400 Sailor MR पदांसाठी 400 जागांची भरती निघाली आहे. भारतीय नौसेना दलाने नुकतच या पदांसाठी पत्रक जाहीर केले आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी येत्या 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करायचा आहे.या पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच इच्छुक उमेदवार हा 1 ऑक्टोबर 2003 ते 23 सप्टेंबर 2003 मध्ये जन्मलेला असावा. Chef, Steward आणि Hygienist या विभागात ही भरती प्रक्रिया होणार आहे. यात ऑनलाईन परीक्षा, शारीरिक स्वास्थ्य, आणि मेडिकल परीक्षा या निकषांच्या आधारावर निवड प्रक्रिया होणार आहे.