Madhya Pradesh Crime: शिवपूर येथे भरदिवसा सराफाची गोळी घालून हत्या, घटना CCTV कैद

मध्यप्रदेशातील शिवपूरी येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवपूरीमध्ये एका सराफाची भरदिवसा गोळी घालून हत्या केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

MP MURDER PC TW

Madhya Pradesh Crime: मध्यप्रदेशातील शिवपूरी येथे धक्कादायक घटना घडली आहे. शिवपूरीमध्ये एका सराफाची भरदिवसा गोळी घालून हत्या केली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आरोपी कर्जामुळे त्रस्त झाला होता त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे अस सांगण्यात येत आहे.  या संदर्भात पोलिस पुढील तपासणी करत आहे. व्यापाऱ्याच्या हत्येनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  (हेही वाचा- ट्रक ची दोरी तुटली अन लोखंडी वस्तू पडली डोक्यात; वांद्रे परिसरातील घटनेत पादचार्‍याचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शिवपूरीच्या खनियाधना गावात घडली आहे. शिवपूरी येथील सराफा धर्मेंद्र सोनी यांच्यावर गोळीबार झाला आहे. हिस्ट्रीशीटर असलेल्या रोहित केवट नावाच्या आरोपीने धमेंद्री यांची हत्या केली. कर्जावरून दोघांमध्ये वाद झाला होता. दोघे ही मढीया तलावाजवळ असलेल्या मंदिरात होते. मंदिरात दोघांमध्ये वाद चांगलाच पेटला. रागाच्या भरातून त्याने हे कृत्य केल्याचे दिसत आहे.

आरोपीने खिशातून बंदूक काढली आणि थेट धर्मेंद्र याच्या डोक्यात गोळी मारली. पीडित व्यक्ती जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले पंरतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर पोलिसांनी पुढील तपासणी सुरु केली आहे. पोलिस अधिकारी प्रशांत शर्मा यांनी सांगितले की, रोहित केवटविरुध्दात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement