India's First Muslim Woman Pilot: सानिया मिर्झा बनणार देशातील पहिली 'मुस्लिम महिला फायटर पायलट'
पहिली महिला पायलट अवनी चतुर्वेदीच्या प्रेरणेने सानिया मिर्झाने हे स्थान मिळवले आहे. सानिया मिर्झा ही देशातील दुसरी मुलगी आहे जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे.
India's First Muslim Woman Pilot: सानिया मिर्झा (Sania Mirza) देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट (IAF Fighter Pilot) बनणार आहे. तिच्या कुटुंबीयांना तिने केलेल्या अप्रतिम कार्याचा अभिमान आहे. सानियाने NDA परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवला आहेय त्यानंतर तिला हे यश मिळाले आहे. सानिया मिर्झा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर (Mirjapur)येथील रहिवासी आहे.
सानिया मिर्झाचे वडील एक टीव्ही मेकॅनिक आहेत जे आपल्या मुलीला मोठ्या मेहनतीने शिकवत आहेत. या यशानंतर सानिया मिर्जा भारतीय हवाई दलातील देशातील पहिली मुस्लिम फायटर पायलट बनणार आहे. (हेही वाचा - First Woman Pilot In Indian Navy: भारतीय नौदलात सब लेफ्टनंट शिवांगी पहिल्या महिला पायलट म्हणून सामील; जाणून घ्या त्यांच्या प्रेरणादायक प्रवासाबद्दल)
सानिया मिर्झाने एनडीए परीक्षेत 149 वा क्रमांक पटकावला आहे. सानियाने 10वीपर्यंतचे शिक्षण गावातून केले असून आता हे यश मिळवून ती 27 डिसेंबरला पुण्यात दाखल होणार आहे. एनडीए 2022 च्या परीक्षेत 400 जागा होत्या. त्यापैकी दोन जागा लढाऊ वैमानिकांसाठी होत्या.
देशातील पहिली महिला फायटर पायलट - अवनी चतुर्वेदी
पहिली महिला पायलट अवनी चतुर्वेदीच्या प्रेरणेने सानिया मिर्झाने हे स्थान मिळवले आहे. सानिया मिर्झा ही देशातील दुसरी मुलगी आहे जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. ती पहिल्यांदा उत्तीर्ण होऊ शकली नाही. परंतु, सानियाने दुसऱ्यांदा प्रयत्न केले. सानियाला पहिल्यापासून अवनी चतुर्वेदीप्रमाणे बनायचं होतं. (हेही वाचा - Rafale Squadron's First Woman Pilot: बनारसची कन्या शिवांगी सिंह होणार राफेल विमानाची पहिली महिला पायलट; लहानपणापासूनच पाहिले होते वैमानिक होण्याचे स्वप्न)
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी 2022 च्या परीक्षेत पुरुष आणि महिला अशा एकूण 400 जागा होत्या. त्यात महिलांसाठी 19 जागा होत्या. त्यापैकी दोन जागा लढाऊ वैमानिकांसाठी राखीव होत्या. यात सानिया मिर्झाने यश मिळवलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)