Madhya Pradesh Shocker: आनंदावर दुखाचा डोंगर, मुलींच्या लग्नाच्या तीन दिवस आधी वडिलांचा अपघाती मृत्यू
मध्य प्रदेशातील इंदौर येथे महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील इंदौर येथे महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे एकीकडे घरात दोन मुलींच्या लग्नाचा मोहोल होता अन् दुसरी कडे अपघातात वडिलांचा अपघात झाला. संतोष वैद्य असं मृतकाचे नाव आहे. भरधाव दुचाकीने धडक दिल्याने संतोष यांचा मृत्यू झाला. ही घटना गांधीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील नया बसेरा, अरिहंत येथे घडली. (हेही वाचा- भाडे देण्याच्या वादातून डोंबिवलीत ओला चालकाला प्रवाशाची मारहाण)
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 14 फेब्रुवारीला संतोष यांच्या दोन मुली, खुशी आणि शिवानी याचं लग्न होतं. संतोष यांना मुलगा नसल्याने लग्नाचा भार त्यांच्यावर आला. सगळीकडून संतोष यांची धावपळ होऊ लागली होती. लग्नाच्या कामासाठी बाहेर निघाले होते. दरम्यान घरी जात असताना एका भरधाव बाईकने संतोष यांना धडक दिली. धडक दिल्याने त्यांना डोक्याला गंभीर जखम झाली. रक्तबंवाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले परंतु त्याचा मृत्यू झाला.
पोलिस या घटनेची चौकशी करत आहे. अपघाताची माहिती कुटुंबियांना देण्यात आले. घटनेनंतर दोन्ही मुलींनी हंबरडा फोडला. नुकतीच त्यांना वडिलांच्या निधनांतर अनुकंप तत्वावर महानगर पालिकेत नोकरी मिळाली होती. बुधवारी मुलींचं लग्न होणार होते त्यासाठी घरचे कामात व्यस्त होते. दरम्यान या घटनेनंतर लग्नाचा आनंद काही क्षणातच दबुन गेला अशी माहिती कुटुंबियानी व्यक्त केली आहे.