Bihar Murder Case: भरदिवसा निवृत्त शिक्षकाची गोळी झाडून हत्या, पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरु; बेगुसराय येथील धक्कादायक घटना

दोन दिवसांपुर्वी एका पत्रकाराची हत्या करण्यात आली होती.ही गोष्ट ताजी असताना दरम्यान अज्ञातांनी निवृत्त शिक्षकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.

gun shot representative image

Bihar Murder Case: बिहार (Bihar) मध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी (Crime) आणि हत्तेचे प्रमाण वाढत आहे. बिहारमध्ये गुन्हेगारी थांबायची नावंच घेत नाही. दरम्यान राज्यातील बेगुसराय येथे निवृत्त शिक्षकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळी झाडून केली या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घनटेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृत झालेल्या व्यक्तीची नोंद घेतली.

बेगुसराय येथील निवृत्त शिक्षकाची भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  जवाहर राय (70) असं या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आली. पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी आले. हत्येचे कारण अद्यापही स्षस्ट झाले नाही. त्यांच्या मालमत्तेच्या वादातून त्यांना मारुन टाकण्यात आले आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी मालमतेच्या वादावरून मुलाची हत्या करण्यात आली होती. जवाहर हे त्या मुलाच्या हत्तेचे साक्षीदार होते.

जवाहार हे एकटे साक्षीदार होते ते या घटने सदंर्भात कोर्टात बयाण देणार होते. त्यापुर्वी त्यांची काही अज्ञातांनी गोळी झाडून हत्या केली. मॉर्निंग वॉकला जात असताना त्याची हत्या केलीय. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. परिसरात त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement