भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा; 'या' सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकते मोठे नुकसान

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

भारतात कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India)सर्व बॅंकेना त्यांच्या ग्राहकांसाठी शक्य तेवढे डिजिटल बॅंकिंग सुविधेचा (Digital Banking) वापर करण्यात पोत्साहित करण्याबाबत अधिसूचित केले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. मात्र, डिजिटल बॅंकिंग सुविधेचा गैरवापर करून जनतेची फसणणूकीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सद्यस्थितीस विविध बँकांनी त्यांच्या ग्राहकांना त्यांचे कर्ज खात्याशी संबंधित ईएमआय पुढे ढकण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली असून याचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगार बँक अधिकारी, कर्मचारी बोलत असल्याचे भासवून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती जसे की, पिन, सीसीव्ही, ओटीपी इत्यादी माहिती प्राप्त करून घेवून फसवणूक करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहेत.

कोरोना विषाणूने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे डिजिटल व्यवहारात वाढ होऊ लागली आहे. परंतु, काही लोकांना बॅंकेच्या निगडीत फसवणूकीचे कॉल येऊ लागले आहेत. यामुळे कोणत्याही नागरिकांनी फसव्या कॉलला बळी पडू नये, यासाठी खबरदारीचा इशारा दिला आहे. या शैलीत ग्राहकांना ईएमआय पुढे ढकलण्यासाठी कॉल येत आहेत. ओटीपी विचारण्यात येतो आणि एकदा ओटीपी सामायिक झाल्यावर खात्यातून रक्कम काढली जाते.कृपया कोणाशीही ओटीपी किंवा आपले कार्ड तपशील किंवा कोणतीही माहिती देऊ नका, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बॅंकेने केले आहे. हे देखील वाचा- Coronavirus Outbreak: भारतातील पहिलं 'संजिवनी' मोबाइल सॅनीटायजेशन युनीट पुणे शहरात दाखल; पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खास सोय

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की, त्यांचे कर्ज खात्याशी संबंधित ईएमआय पुढे ढकलण्यासाठी बँकेकडून एसएमएस प्राप्त झाल्यास किंवा बँकेचा अधिकारी, कर्मचारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मागितल्यासन देवू नये किंवा समोरील व्यक्तीने सांगितल्यानुसार कोणतेही अ‍ॅप्लिकेशन मोबाइलमध्ये डाउनलोड करू नये.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif