Wholesale Price Index Inflation: जनतेला वाढत्या महागाईतून दिलासा! जानेवारीमध्ये देशभरातील घाऊक महागाई दर 12.96 टक्क्यांवर पोहोचला

एप्रिल 2021 पासून सलग दहाव्या महिन्यात घाऊक महागाई 10 टक्क्यांच्या वर राहिली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Wholesale Price Index Inflation: वाढत्या महागाईतून जनतेला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. जानेवारीमध्ये घाऊक महागाई दरात घट झाली असून तो 12.96 टक्क्यांवर आला आहे. त्या तुलनेत डिसेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर 13.56 टक्के होता. मागील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर 14.87 टक्के होता.

उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ही आकडेवारी समोर आली आहे. ज्यामध्ये डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये महागाई दरात घट नोंदवली गेली आहे. यापूर्वी घाऊक महागाईच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत होती. डिसेंबरमधील घाऊक महागाईचे आकडे 14.23 टक्क्यांवरून 14.87 टक्क्यांवर सुधारले आहेत. (वाचा - Chinese Apps Ban in India: चीनवर भारताचा डिजिटल स्ट्राइक; मोदी सरकारने Free Fire सह 54 चिनी अॅप्सवर घातली बंदी, येथे पहा यादी)

वर्षभरापूर्वी घाऊक महागाईचा दर 2.5 टक्के -

एक वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये घाऊक महागाईचा आकडा खूपच कमी होता. जानेवारी 2021 मध्ये, घाऊक महागाई दरावर आधारित WPI महागाई 2.51 टक्के होती. अशाप्रकारे पाहिले तर घाऊक महागाई दरात वार्षिक आधारावर जोरदार वाढ झाली आहे.

जानेवारी 2022 मध्ये महागाई वाढण्यामागील कारण म्हणजे खाद्यतेल, खनिज तेल, कच्चे तेल आणि वायूसोबतच पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. मुलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादनांबरोबरच खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ झाली असून त्यामुळे घाऊक महागाई दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ दिसून आली आहे. असे अधिकृत प्रसिद्धीमध्ये म्हटले आहे.

WPI महागाई दरात सलग 10 महिने वाढ -

घाऊक महागाई डिसेंबर 2021 मध्ये 13.56 टक्के आणि जानेवारी 2021 मध्ये 2.51 टक्के होती. एप्रिल 2021 पासून सलग दहाव्या महिन्यात घाऊक महागाई 10 टक्क्यांच्या वर राहिली आहे. आकडेवारीनुसार, जानेवारी 2022 मध्ये खाद्यपदार्थांची महागाई 10.33 टक्क्यांवर पोहोचली आहे. डिसेंबर 2021 मध्ये तो 9.56 टक्के होता.

अन्नधान्याच्या किमतीच वाढ -

त्याचप्रमाणे, मागील महिन्यात 31.56 टक्‍क्‍यांच्या तुलनेत भाज्यांच्या किमतीत 34.85 टक्के वाढ झाली आहे. कडधान्ये, तृणधान्ये आणि धानाची महागाई दर महिन्याच्या आधारे वाढली आहे. जानेवारीमध्ये अंडी, मांस आणि मासे यांच्या महागाईचा दर 9.85 टक्के होता. तर बटाट्याच्या भावात 14.45 टक्के आणि कांद्याच्या दरात 15.98 टक्क्यांनी घट झाली आहे.

पेट्रोलियम पदार्थांचे वाढले दर -

जानेवारीमध्ये उत्पादित वस्तूंच्या महागाई दरात घट होऊन 9.42 टक्क्यांवर आली आहे. डिसेंबर 2021 मध्ये तो 10.62 टक्के होता. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील चलनवाढ जानेवारीमध्ये 32.27 टक्क्यांवर राहिली आहे, जी मागील महिन्यात 32.30 टक्के होती.