Bhopal Shocker: व्हॅलेंटाईन डेला प्रेयसीला घरी आणण्यास दिला नकार; संतापलेल्या मुलाने आईची गळा दाबून केली हत्या, आरोपीला अटक
पण त्याच्या आईने त्याला तसे करू दिले नाही. यावरून रौनक आणि त्याच्या आईमध्ये वाद झाला. त्यानंतर रौनकने आईला धक्काबुक्की केल्याने ती खाली पडली. पलंगावर आदळल्याने तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या.
Bhopal Shocker: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ (Bhopal)मध्ये खुनाची खळबळजनक घटना घडली आहे. भोपाळमध्ये व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) च्या निमित्ताने आईने मुलाच्या प्रेयसीला घरात येण्यापासून रोखले. त्यानंतर संतापलेल्या मुलाने आईची गळा दाबून हत्या (Murder) केली. भोपाळ पोलिसांनी आता या प्रकरणाचा खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी शबरीनगर येथे राहणाऱ्या नंदा मोरे यांचा मृत्यू झाल्याचा फोन आला. पोलीस आल्यावर महिलेच्या तोंडावर जखमेच्या खुणा होत्या आणि तिचे ओठ कापलेले होते.
याबाबत पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता तो कोणतेही ठोस उत्तर देऊ शकला नाही. मात्र, शवविच्छेदन अहवालात महिलेचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे समोर आल्याने पोलिसांचा मुलगा रौनकवर संशय बळावला. यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आईच्या मृत्यूचे संपूर्ण सत्य उघड केले आणि आपला गुन्हा मान्य केला. (हेही वाचा -Wife Murder Husband: दारूच्या व्यसनाला कंटाळून पतीची निद्रावस्थेत निर्घृण हत्या, आरोपी पत्नी स्वत: पोलिस ठाण्यात हजर)
रौनकने पोलिसांना सांगितले की, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी त्याला रात्री उशिरा त्याच्या मैत्रिणीला घरी आणायचे होते. पण त्याच्या आईने त्याला तसे करू दिले नाही. यावरून रौनक आणि त्याच्या आईमध्ये वाद झाला. त्यानंतर रौनकने आईला धक्काबुक्की केल्याने ती खाली पडली. पलंगावर आदळल्याने तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. (हेही वाचा - Mira Road Murder Case: मीरा रोड खून प्रकरणातील आरोपी मनोज सानेला 6 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी)
आरोपीने सांगितले की, यानंतर आई उठली आणि त्याला चापट मारली. यामुळे रौनक इतका संतापला की त्याने आईची कपड्याने गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.