ATM वापराबाबत शुल्क होणार कमी; RBI लवकरच घोषणा करण्याची शक्यता

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात या प्रस्तावाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Money Control.com)

आजकाल रोख व्यवहारांपेक्षा डिजिटल आणि कार्ड पेमेंट्सकडे ग्राहकांचा कल अधिक वळला आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने NEFT आणि RTGS शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता अन्य बॅंकांच्या ATM द्वारा पैसे काढण्यासाठी शुल्क कमी करण्यासाठी आरबीआयचा विचार असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात या प्रस्तावाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून NEFT आणि RTGS च्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांवर System Charges नाही; आरबीआय चे बॅंकांना आदेश

ATM शुल्क आकारणीचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने अहवाल बनवला असून त्यामध्ये शुल्क कमी करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. या समितीकडून लवकरच अहवाल आरबीआयकडे दिला जाणार आहे. मात्र हे शुल्क पूर्णपणे रद्द न करता कमी केले जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  RTGS च्या वेळेत बदल, 1 जून पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करू शकणार पैसे ट्रान्सफर

बॅंकांच्या एटीएममधून अन्य बॅंकांचे ATM वापरून पैसे काढल्यास त्यावर निश्चित मर्यादेपर्यंत होणाऱ्या ट्रान्झॅक्शनसाठी शुल्क आकारले जात नाही. मात्र त्यापुढे विशिष्ट शुल्क आकारले जाते. सध्या खाजगी बॅंका, मेट्रो पोलिटन शहरं यामध्ये 5 ट्रान्झॅक्शन मोफत आहेत. त्यानंतर मात्र 20 रूपये अतिरिक्त शुल्क आकारले जाते.