पॉर्न साइटमुळे बलात्काराच्या घटना वाढत आहेत - मुख्यमंत्री नितीश कुमार
त्यामुळे समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पॉर्न साइट्समुळे बलात्काराच्या घटना वाढत असून या साइट्सवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली आहे.
मागील आठवड्यात हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पॉर्न साइट्समुळे बलात्काराच्या घटना वाढत असून या साइट्सवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली आहे. (हेही वाचा - Unnao Rape Case: दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेने घेतला अखेरचा श्वास)
नितीश कुमार यांनी उन्नाव तसेच हैदराबादमधील बलात्कार घटनावर भाष्य करत चिंता व्यक्त केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नितीश कुमार म्हणाले की, 'देशातील विविध भागांमधून रोज बलात्काराच्या घटना घडत आहेत. ही बाब अत्यंत वाईट आहे. हा सर्व प्रकार का होतोय? याचा विचार करायला हवा. इंटरनेटवर चालणाऱ्या पॉर्न साइट्स याला कारणीभूत आहेत. सोशल मीडियाचे आपल्याला फायदे तसेच तोटेही आहेत. परंतु, काही लोक त्याचा दुरुपयोग करतात. इंटरनेटवर पॉर्न साइट्स चालवल्या जातात. त्यातून लोकांची मानसिकता बिघडते. त्यामुळे देशाचे नाव खराब होते. या साइट्सवर लवकरच बंदी घातली गेली पाहिजे. बिहार सरकारच्या वतीने आम्ही केंद्र सरकारकडे लेखी स्वरुपात मागणी करणार आहोत,' असंही नितीश कुमार यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा - बलात्कार करणाऱ्या दोषीला जगातील 'या' देशात आहेत कठोर शिक्षा; पाहा काय आहे शिक्षेचं स्वरूप
बिहार सरकार 'उन्नयन बिहार' कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या उपक्रमाअंतर्गत महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.