धक्कादायक! विद्यार्थ्यांना समजावे म्हणून शिक्षकांनी वर्गातच दाखवले बलात्काराचे प्रात्यक्षिक; गुन्हा दाखल
पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांवर शुक्रवारी चक्क बलात्काराचे प्रात्यक्षिक वर्गात करून दाखवले. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
विजयवाडा: सध्या डिजिटल काळ चालू आहे. अगदी छोटी छोटी मुलेही स्मार्टफोन वापरताना दिसत आहेत. आजकालचे विद्यार्थीही त्यामानाने जरा जास्तच हुशार आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही त्याच पद्धतीने शिकवावे लागते. विद्यार्थ्यांना शेअरी पेक्षा प्रात्यक्षिक करून दाखविलेले जास्त समजेल या समजातून आंध्र प्रदेशातील शिक्षकांकडून धक्कादायक कृत्य घडले आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांवर शुक्रवारी चक्क बलात्काराचे प्रात्यक्षिक वर्गात करून दाखवले. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
बलात्कार काय असतो किना तो कसा होतो, हे दाखवून देण्यासाठी त्यांनी वर्गातच बलात्काराचा देखावा उभा केला होता. मिळालेल्या माहितीनुसार काही पालकांनी या शिक्षकांवर हल्ला केला होता, या घटनेचा तपास चालू असताना तीन विद्यर्थ्यांचे भांडण समोर आले. यामध्ये ही मुलगी थोडीफार जखमी झाली होती. या प्रकरणाचा छडा लावत असताना या तीन मुलांना बलात्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी निवडण्यात आले असल्याचे समोर आले. याबाबत, ‘चिंतलपुडी मंडलमध्ये झालेल्या घटनेची सत्यता तापसण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे”, असे शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. (हेही वाचा: पैसे संपले म्हणून बायकोवर लावला जुगाराचा डाव; हरल्यावर मित्रांनी केला सामूहिक बलात्कार; तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांचा नकार)
जिल्हा शिक्षण अधिकारी सी.व्ही. रेणुका म्हणाले की, ‘वर्गात नेमके काय घडले यासंबंधी ‘प्रथमदर्शनी मूल्यांकन’ करण्यासाठी शनिवारी शाळेत भेट घेणार आहेट. मात्र तालुका अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात अशी कोणतीही घटना घडलेली नाही.’ शाळेने देखील ही बाबाब मान्य केली नाही. तीन मुलांच्या झालेल्या किरकोळ भांडणात ही मुलगी जखमी झाली असल्याचे शालाने सांगितले.