Tata Group to Acquire Bisleri: मुलीने व्यवसाय हाताळण्यास नकार दिल्याने मालक Ramesh Chauhan यांनी विकली 'बिसलेरी' कंपनी; टाटा समूहासोबत झाली 7 हजार कोटींची डील

तथापि, बिसलेरी विकणे हा एक वेदनादायक निर्णय होता. मला टाटा संस्कृती आवडते आणि त्यामुळे इतर खरेदीदार असूनही मी टाटा निवडले.

Bisleri and Tata Group (PC - Wikimedia Commons/ wikipedia)

Tata Group to Acquire Bisleri: थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे शीतपेय ब्रँड कोका-कोलाला विकल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर रमेश चौहान यांनी 'बिसलेरी इंटरनॅशनल' (Bisleri International) टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) ला विकली आहे. हा करार 7,000 कोटींना झाला. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. चौहान यांनी सांगितलं की, बिस्लेरीला विस्ताराच्या पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांच्याकडे उत्तराधिकारी नाही. मुलगी जयंतीला व्यवसायात फारसा रस नाही. बिस्लेरी ही भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी आहे. करारानुसार, सध्याचे व्यवस्थापन दोन वर्षांसाठी सुरू राहील. रमेश चौहान पुढे बोलताना म्हणाले की, टाटा समूह अधिक चांगल्या पद्धतीने बिसलेरी ब्रँड पुढे नेईल. तथापि, बिसलेरी विकणे हा एक वेदनादायक निर्णय होता. मला टाटा संस्कृती आवडते आणि त्यामुळे इतर खरेदीदार असूनही मी टाटा निवडले. रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डॅनोनसह बिस्लेरी खरेदी करण्यासाठी अनेक दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा - चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचे दुष्परिणाम, होऊ शकतात हे गंभीर आजार, जाणून घ्या)

चॅरिटीमध्ये गुंतवणार पैसे -

चौहान म्हणाले की, व्यवसाय विकल्यानंतर त्यांना कंपनीमध्ये माइनोरिटी स्टेक होल्ड ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. त्याचबरोबर बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर ते पाणी साठवण, प्लॅस्टिक रिसायकलिंग यांसारख्या पर्यावरण आणि धर्मादाय कार्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं चौहान यांनी म्हटलं आहे.

FY23 मध्ये अंदाजे 220 कोटी नफा -

चौहान म्हणाले की, FY23 साठी बिसलेरी ब्रँडची उलाढाल 220 कोटी रुपयांच्या नफ्यासह 2,500 कोटी रुपयांची आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने 1181.7 कोटी रुपयांची विक्री आणि 95 कोटी रुपयांचा नफा नोंदवला.

दरम्यान, पार्ले एक्सपोर्ट्सने 1969 मध्ये एका इटालियन व्यावसायिकाकडून बिसलेरी विकत घेतली आणि भारतात मिनरल वॉटरची विक्री सुरू केली. 50 वर्षांच्या कारकिर्दीत, चौहान यांनी बिस्लेरीला भारतातील शीर्ष मिनरल वॉटर ब्रँड बनवले. चौहान यांनी वेदिका हा प्रिमियम नॅचरल मिनरल वॉटर ब्रँडही तयार केला आहे. याशिवाय चौहान थम्सअप, गोल्ड स्पॉट, सित्रा, माझा आणि लिम्का यांसारख्या अनेक ब्रँडचे निर्माते आहेत. (हेही वाचा - तुम्हाला उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आताच सावध व्हा कारण तुम्हाला होऊ शकतात 'हे' आजार)

रमेश चौहान यांची मुलगी जयंती वयाच्या 24 व्या वर्षी बिस्लेरीमध्ये रुजू झाली. त्यांनी तळागाळात सुरू केलेल्या दिल्ली कार्यालयाचा पदभार स्वीकारला. त्यांनी कारखान्याचे नूतनीकरण केले. 2011 मध्ये त्यांनी मुंबई कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. नवीन उत्पादनांच्या विकासाबरोबरच, ती जुन्या उत्पादनांच्या ऑपरेशनला सुव्यवस्थित करण्यात देखील सामील होती. जयंतीने लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचे धडे घेतले आहेत.



संबंधित बातम्या

NZ vs ENG 3rd Test 2024 Day 4 Live Streaming: न्यूझीलंड विजयापासून 8 विकेट दूर, जाणून घ्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहायचे

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील