Ayodhya ShriRam Mandir: अयोध्येत श्रीराम मंदिरातील गर्भगृहात 24 जानेवारी 2024 रोजी विराजमान होणार रामलल्ला

श्री राम तीर्थ क्षेत्राच्या देखरेखीखाली बांधण्यात येत असलेल्या मंदिरातील गर्भगृह लाल दगडाने बांधले जात असून त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर 24 जानेवारी 2024 रोजी रामलला शुभ मुहूर्तावर विराजमान होणार आहेत.

Ayodhya's Ram Mandir (Photo Credits: PTI)

Ayodhya ShriRam Mandir: रामनगरी अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या (ShriRam) भव्य मंदिराच्या उभारणीच्या कामाला सध्या चांगलाच वेग आला आहे. श्री राम तीर्थ क्षेत्राच्या देखरेखीखाली बांधण्यात येत असलेल्या मंदिरातील गर्भगृह लाल दगडाने बांधले जात असून त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर 24 जानेवारी 2024 रोजी रामलला शुभ मुहूर्तावर विराजमान होणार आहेत. श्री राम लल्ला जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी, आचार्य सत्येंद्र दास जी महाराज यांनी सांगितले की, प्रभू श्री राम मंदिराचे काम 2023 मध्ये पूर्ण होईल. या भव्य मंदिराचे गर्भगृह लाल दगडाचे आहे. या शुभ मुहूर्तावर 24 जानेवारी 2024 रोजी श्री राम लल्ला विराजमान होणार आहेत. अयोध्येतील श्री राम लल्लाच्या भव्य मंदिरातील गर्भगृहाचे बांधकाम 1 जूनपासून सुरू होणार आहे. 1 जून रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहाच्या बांधकामाचा शुभारंभ करणार आहेत. तत्पूर्वी, 25 मार्च 2020 रोजी त्यांनी श्री राम लल्ला यांना मंडपाच्या मंदिरातून काढून मानस मंदिरात स्थापित केले. (हेही वाचा - राम मंदिर- बाबरी मशीद वादाचा काय होता इतिहास? जाणून घ्या सविस्तर)

अयोध्येतील श्री रामलल्ला मंदिराच्या गर्भगृहाच्या उभारणीच्या कामासाठी मंदिर परिसरात पाच दिवसीय पूजेचे काम आज सुरू झाले आहे. अयोध्या महानगरपालिकेचे महापौर ऋषिकेश उपाध्याय पूजेचे यजमान झाले आहेत. देशातील निवडक 40 विद्वान पाच दिवसांच्या विशेष पूजेमध्ये विधी करणार आहेत. सर्व देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी विधीवत पूजा केली जात आहे.

या विशेष विधी अंतर्गत सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 3 ते 6.15 या वेळेत नियमित दोन सत्रात रुद्री, दुर्गा सप्तशती, विष्णु सहस्रनाम, चतुर्वेदाचे पठण केले जात आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी राजस्थानचे पंडित हितेश अवस्थी, सिद्धार्थनगरचे उमेश ओझा, बंगालचे लीलाराम गौतम, दिल्लीचे पवन शुक्ला, वाराणसीचे रामजी मिश्रा आणि दुर्गाप्रसाद, शिवशंकर वैदिक, रघुनाथदास शास्त्री, अयोध्येचे प्रमोद शास्त्री यांच्यासह 40 विद्वान उपस्थित आहेत.

दरम्यान, 5 जून रोजी हा विधी संपन्न होईल. ज्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य देखील उपस्थित राहणार आहेत. श्री राम लल्ला मंदिराच्या गर्भगृहाच्या भूमिपूजनासाठी गर्भगृह फुलांनी सुसज्ज केले जाईल. येथे 1 जून रोजी होणाऱ्या भूमिपूजनाची व्यापक तयारी करण्यात आली आहे.