Rajasthan Shocker: शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन मास्कला आग लागून एकाचा मृत्यू, राजस्थानमधील धक्कादायक प्रकार उघडकीस
या घटनेत मुलाचा मृत्यू झाला आहे.
Rajasthan Shocker: राजस्थान राज्यातील कोटा येथील हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णावर उपचार करताना रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला (Oxygen Mask) अचानक आग लागली. या घटनेत २३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ICU मध्ये उपचार चालू असताना अचानक आग लागली. अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारी रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर त्याची चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
कोटामधील अनंतपुरा तालाब येथील रहिवासी वैभव शर्मा या मृताच्या कुटुंबीयांनी न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. हा व्हिडिओ बाहेर उपस्थित असलेल्या व्यक्तीने शुट केला आहे.लवकरच या संदर्भात माहिती समोर येईल.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
व्हिडिओ