Rajstan Shocker: धक्कादायक! राजस्थानमध्ये 16 वर्षीय मुलीचा शाळेतील शिक्षकाने बलात्कार करून केली हत्या; मृतदेह फेकला विहीरीत

शिक्षकाने मुलीवर बलात्कार केला त्यानंतर तीची हत्या केली. पोलीसांनी या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Death | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Rajstan Shocker: सवाई माधोपूर जिल्ह्यात गुरुवारी एका 16 वर्षीय मुलीचा मृतदेह एका विहिरीत सापडला असून, तिच्या शाळेतील शिक्षकाने तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसराथ खळबळ उडाली आहे. आरोपींविरुद्ध बोंली पोलिस ठाण्यात बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. शिक्षकाला कामावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. राजस्थानच्या या घनटेमुळे मयत तरुणीची नातेवाईकांनी आंदोलने केली.

सरकारी शाळेतील बारावीत शिकणारी मुलगी 8 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिच्या शाळेतील शिक्षक रामरतन मीणा विरुद्ध तिचे अपहरण केल्याची तक्रार दाखल केली, असे बोन्ली मीनाच्या बोन्ली मंडळ अधिकारी यांनी सांगितले.गुरुवारी मृतदेह सापडल्यानंतर मुलीचे नातेवाईक आणि स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह शाळेच्या मैदानात ठेवून आंदोलन केले, असे पोलिसांनी सांगितले. आंदोलनात नातेवाईकांनी नुकसान भरपाई, शाळेतील संपूर्ण कर्मचार्‍यांची हकालपट्टी, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून चौकशी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

आरोपी शिक्षक रामरतन मीणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे. शाळेतील सर्व पुरुष कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यात आल्याचे पोलीस  अधिकाऱ्यांनी  सांगितले. गुरुवारी महिलांसाठी सरकारच्या 'इंदिरा गांधी स्मार्टफोन' योजनेचा शुभारंभ करताना राठोड म्हणाले की, राज्यातील मुली आणि महिलांना स्मार्टफोनऐवजी न्यायाची गरज आहे. 9 ऑगस्ट रोजी बोनली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. फिर्यादीने सांगितले की, त्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते आणि ती शिकत असलेल्या शाळेतील शिक्षकावर त्याचा संशय होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला तत्काळ अटक केली. आज मुलीचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला. पुढील तपास सुरू आहे,” असे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल यांनी सांगितले.