राजस्थान: खाजगी बसची ट्रकला जोरदार धडक; 10 जणांचा मृत्यू, २५ जखमी

जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहे.

Road Accident (Photo Credit: ANI)

राज्यस्थान (Rajasthan) राज्यातील बिकानेर (Bikaner) जिल्ह्यात खाजगी बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली असून 10 जणांचा मृत्यू तर, 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या बस आणि ट्रकला रस्त्यावरुन हटवण्याचे काम सुरु आहे. तसेच हा अपघात कशामुळे घडला याचा स्थानिक पोलीस शोध घेत आहे.

राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 वर सोमवारी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, ज्यावेळी हा अपघात घडला तेव्हा बसमधून 30 ते 35 प्रवाशी प्रवास करत होते. खजमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर योग्य उपचार केले जात आहे. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त असून वाहने हटवून मार्ग पुन्हा सुरु करण्याचे काम करण्यात येत आहे. हे देखील वाचा- अहमदनगर: नगर-दौड महामार्गावर भीषण अपघात; भरधाव गाडीने दिली ट्रक ला धडक

एएनआयचे ट्विट-

गेल्या आठवड्यात याच राष्ट्रीय महामार्गावर एक अपघात घडला होता. त्यावेळी ही सात जणांना आपला जीव गमवावा लागला होता. महाराष्ट्रात रस्ता अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रशासनाकडून या संख्येवर आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.