राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांचे पती कौशल स्वराज यांना लिहिले पत्र म्हणाले 'त्या एक अद्भूत नेत्या होत्या'
त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणाने, आपल्या अनुभवाने आणि गोड बोलण्याने तसेच सहृदयतेने केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे तर, पक्षापलीकडेही इतर पक्षांच्या नेत्यांचीही मनं जिंकली.
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचे पती कौशल स्वराज (Kaushal Swaraj) यांना एक पत्र लिहीले आहे. आपल्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी सुषमा स्वराज यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुषमा स्वराज या जेष्ठ आणि आक्रमक भाजप (BJP) नेत्या होत्या. तसेच, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील पहिल्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होत्या. वयाच्या सदुसष्ठाव्या (67) वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने अनेकंना धक्का बसला आहे.
राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्याबद्दल कौशल स्वराज यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सुषमा स्वराज यांच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणाने, आपल्या अनुभवाने आणि गोड बोलण्याने तसेच सहृदयतेने केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे तर, पक्षापलीकडेही इतर पक्षांच्या नेत्यांचीही मनं जिंकली. त्या अनेक राजकारण्यांसह कार्यकर्ते आणि जनतेच्या आवडत्या नेत्या होत्या. त्या एक अद्भूत नेत्या होत्या.
एएनआय ट्विट
दरम्यान, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुनही सुषमा स्वरज यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'सुषमा स्वराज यांच्या निधनामुले मला धक्का बसला. त्या एक अद्भुत नेता होत्या. त्यांची पक्षापलीकडेही अनेकांशी मैत्री होती. अशा या दु:खाच्या क्षणी स्वराज यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. सुषमा स्वराज यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो.' (हेही वाचा, सुषमा स्वराज यांच्यावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार; शासकीय इतमामात शेवटचा निरोप)
राहुल गांधी ट्विट
दरम्यान, काँग्रेस पक्षानेही सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 'सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्द आम्हाला प्रचंड दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबिय आणि त्यांच्या स्नेह्यांप्रती आमच्या संवेदना आहेत.'