Rahul Gandhi Citizenship Row: राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द करावे; सुब्रमण्यम स्वामींनी हायकोर्टात दाखल केली याचिका
राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.
Rahul Gandhi Citizenship Row: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत (Citizenship) भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (High Court) याचिका (Petition) दाखल केली आहे. राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयाकडे केली आहे. राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट आहे. याप्रकरणी केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.
राहुल गांधींकडे ब्रिटिश पासपोर्ट - सुब्रमण्यम स्वामी
सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी केंद्र सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा, अशी मागणी केली आहे. 2019 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा केला होता. भारतीय राज्यघटनेच्या कलम 9 चा संदर्भ देत सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे की, ते फक्त एकाच देशाचे नागरिक असू शकतात. भारतात फक्त एकच नागरिकत्व दिले जाते. केंद्र सरकारने 20 एप्रिल 2019 रोजी राहुल गांधींना नागरिकत्वाशी संबंधित तक्रार प्रकरणी नोटीस पाठवली होती. (हेही वाचा -Rahul Gandhi Viral Video In Nepal Pub: नेपाळच्या नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसले राहुल गांधी; व्हिडिओ शेअर करत भाजपने साधला निशाणा)
सुब्रमण्यम स्वामी यांनी पत्रात पुढे म्हटलं आहे की, बॅकअप्स लिमिटेड नावाची कंपनी 2003 मध्ये युनायटेड किंगडममध्ये नोंदणीकृत झाली होती. संचालन आणि सचिव राहुल गांधी होते. 2005 आणि 2006 मध्ये दाखल केलेल्या कंपनीच्या वार्षिक रिटर्नमध्ये राहुल गांधींची जन्मतारीख 19 जून 1970 नमूद करण्यात आली होती आणि त्यांचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे नमूद करण्यात आले होते.