Punjab Honour Killing: कुऱ्हाडीने वार करत बहिणीसह तिच्या पतीची केली हत्या, आरोपी भावाला अटक; भंटिडा येथील घटना
भंटिडा येथील तुंगवली गावात एका व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून आपल्या बहिणीची आणि तिच्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे.
Punjab Honour Killing: पंजाबमधील भंटिडा येथून रविवारी ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंटिडा येथील तुंगवली गावात एका व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून आपल्या बहिणीची आणि तिच्या पतीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या जोडप्याने चार वर्षांपुर्वी कोर्ट मेरेज केले होते परंतु काही कारणांमुळे दोघेही वेगळे राहत होते. पंजाबच्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- नातेवाईकांसमोर 10 रुपये मागितल्याने बापानेच पोटच्या मुलीचा गळा आवळून केला खून)
अश्या प्रकारे केला खून
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पतीचे नाव जगमीत सिंग होते. तो भटींडा येथे हेड कॉन्सेटेबल होता. रविवारी संध्याकाळी जगमीत सिंग मद्यधुंद अवस्थेत तुंगवाली गावात आला. पत्नी माहेरी असल्याने पत्नीला भेटण्यासाठी तुंगवाली गावात आला. बेअंत कौर उर्फ मणी असं महिलेचे नाव असून ती परिचारिका म्हणून काम करत होती. पती पत्नीच्या वादानंतर बेअंत कौरचा भाऊ आला. त्याने जगमीत सिंगवर हल्ला केला. या हल्ल्यात बेअंतने मध्यस्थी केली असताना भावाने बहिनीवर कुऱ्हाडीने हल्ला केला या घटनेत ती गंभीर झाली आणि त्यानंतर भावाने बहिणीच्या पतीवर हल्ला केला. दरम्यान दोघांचा मृत्यू झाला.
आरोपीला अटक
या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कारवाईत आले असून या प्रकरणी नाठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत पोलिस कसून चौकशी करत आहे.