PM Narendra Modi Mann Ki Baat: दसऱ्याच्या मुहुर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'मन की बात' या कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार

दसऱ्याच्या मुहुर्तावर उद्या सकाळी 11 वाजता नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

File Image of Narendra Modi addressing nation via Mann Ki Baat | (Photo Credits: PTI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून देशाला संबोधित करणार आहेत. दसऱ्याच्या मुहुर्तावर उद्या सकाळी 11 वाजता नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. नरेंद्र मोदी यांचा हा 70वा कार्यक्रम असणार आहे. नरेंद्र मोदी यांचे हे संभाषण अनेक विषयांवर आधारित असून ऑल इंडिया रेडिओ, डीडी आणि नरेंद्र मोदी मोबाइल अ‍ॅपवर सकाळी 11 वाजता प्रसारित केले जाईल. सध्या देशात लॉकडाऊन 5.0 सुरु आहे. नवरात्रौत्सव आज संपला असून पुढच्या महिन्यात दिवाळीचा सण आहे. तसेच सण-उत्सावाच्या या कळात करोनाचा फैलावही वेगाने होण्याची भीती आहे. त्यामुळे मोदी त्या दृष्टीने काय घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मन की बातमधून नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी 1922 क्रमांकावर कॉल करु शकतात. त्यानंतर तुम्हाला एक फोन येईल ज्यात तुम्हाला आपली भाषा निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला हा कार्यक्रम तुमच्या भाषेतून ऐकता येणार आहे. हे देखील वाचा- COVID-19 Vaccines: भारतामध्ये जूनपर्यंत उपलब्ध होईल कोरोना विषाणूची लस; मात्र सर्वांपर्यंत पोहोचवणे असे आव्हान- Kiran Mazumdar-Shaw

नरेंद्र मोदी यांचे ट्विट-

याआधी नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्याच्या 27 तारखेला मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले होते. नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून लोकांना सांगितले की, ते नामो किंवा मायगोव्ह अॅपचा वापर करून किंवा त्यांचे संदेश रेकॉर्ड करून किंवा 1800-11-7800 वर कॉल करून त्यांचे प्रश्न आणि सूचना पाठवू शकतात.