COVID-19: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

कोरोना विषाणूने आतापर्यंत 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याची आकडेवारी समोर आली आहे. जगभरातील 170 हून अधिक देशांसह भारतही कोरोना विरुद्ध लढाई लढत आहे.

Narendra Modi (PC - Twitter)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत 42  हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 7 लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याची आकडेवारी समोर आली आहे. जगभरातील 170 हून अधिक देशांसह भारतही कोरोना विरुद्ध लढाई लढत आहे. यातच कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता भारताचे पतंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या 2 एप्रिल रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे (Video Conference) संवाद साधणार आहेत, अशी माहिती एएनआय वृत्त संस्थेने दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात संचारबंदी घोषीत केली आहे. यातच ते उद्याच्या व्हिडिओ कॉन्फरन्सींग माध्यामातून नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या विषाणूचा वाढता फैलाव पाहता त्याच्याशी लढण्यासाठी देशभरात व्यापक तयाऱ्या केल्या जात आहेत. सर्वांना या काळात घरांमध्ये राहणे गरजेचे आहे. हाच या आजापासून वाचण्याचा चांगला उपाय आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली होती. मात्र, काही ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या नरेंद्र मोदी यांनी महत्वाची घोषणी केली आहे. तसेच उद्या देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व सीमा 14 चेकनाक्याच्या माध्यामातून बंद केल्या; पहा फोटो

एएनआयचे ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 8 लाख 57 हजार वर पोहचली आहे. यांपैकी 42 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 78 हजार रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 637 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 133 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 321 वर पोहचली आहे. यात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif