PM Modi in Greece: ग्रीसच्या राष्ट्रपती कतरिना यांच्याकडून पंतप्रधान मोदींना 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर' पुरस्कार प्रदान

या प्रसंगी पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) हँडलवर लिहिले, मला ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर बहाल केल्याबद्दल मी राष्ट्रपती कॅटरिना एन. साकेलारोपौलो, सरकार आणि ग्रीसच्या लोकांचे आभार मानतो.

Prime Minister Modi And Greece President Katerina Sakellaropoulou (PC - ANI)

PM Modi in Greece: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांना अथेन्स येथे ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन साकेलारोपौलो (Greece President Katerina Sakellaropoulou) यांच्या हस्ते ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर (Grand Cross of the Order of Honour) प्रदान करण्यात आला. यापूर्वी अथेन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष साकेलारोपौलो यांच्या भेटीदरम्यान चांद्रयान-3 मोहिमेच्या यशाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले, चांद्रयान-3 चे यश हे केवळ भारताचे यश नाही तर ते संपूर्ण मानवजातीचे यश आहे. चांद्रयान-3 मोहिमेद्वारे गोळा केलेल्या डेटाचे परिणाम संपूर्ण वैज्ञानिक बंधुत्व आणि मानवजातीला मदत करतील.

ब्रिक्स परिषदेला हजेरी लावल्यानंतर पंतप्रधान मोदी शुक्रवारी एक दिवसीय दौऱ्यावर ग्रीसची राजधानी अथेन्स येथे पोहोचले आहेत. अथेन्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्रीसचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेटेरिटिस यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर भारतीय समुदायाने त्यांचे जोरदार स्वागत केले. (हेही वाचा - BRICS 2023: PM मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात 'या' विषयी झाली चर्चा (Watch Video))

अथेन्समध्ये ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन साकेलारोपौलो यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना 'ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर' प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पीएम मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले, मला ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर बहाल केल्याबद्दल मी राष्ट्रपती कॅटरिना एन. साकेलारोपौलो, सरकार आणि ग्रीसच्या लोकांचे आभार मानतो.

पंतप्रधान मोदींनी अथेन्समधील 'टॉम्ब ऑफ द अननोन सोल्जर' येथे सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. अथेन्समधील सिंटग्मा स्क्वेअरमध्ये जुन्या रॉयल पॅलेसच्या समोर एक युद्ध स्मारक आहे. हे विविध युद्धांमध्ये मरण पावलेल्या ग्रीक सैनिकांना समर्पित स्मशानभूमी आहे. येथे पंतप्रधान मोदींनी पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. पंतप्रधान मोदी अथेन्समधील हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा भारतीय समुदायाचे लोक तेथे त्यांची वाट पाहत होते. पंतप्रधान मोदी हॉटेलमध्ये पोहोचताच लोकांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा -

ग्रीसच्या या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदींसोबत 12 भारतीय उद्योगपतीही अथेन्सला पोहोचले आहेत. पीएम मोदींचा ग्रीस दौरा देखील खास आहे. कारण 40 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ग्रीसला भेट देत आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी ग्रीसला भेट दिली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif