Power Shortage in India: बिहार-झारखंडसह अनेक राज्यांमध्ये 'ब्लॅक आऊट' होण्याची शकता; महाराष्ट्रात केवळ 6 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, थर्मल पॉवर प्लांट्समध्ये कोळशाच्या कमतरतेमुळे, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणामध्ये वीज संकट अधिक गडद झाले आहे.
Power Shortage in India: भारतात विजेचे संकट अधिक गडद होत आहे. देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाबसह सुमारे 10 राज्यांमध्ये विजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. सध्या अनेक राज्यांजवळील वीजनिर्मिती केंद्रांत कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्र आणि पंजाबसह अनेक राज्यांतील वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये वीजनिर्मितीसाठी एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा स्थितीत या वीजनिर्मिती प्रकल्पांना लवकरच कोळसा पुरवठा न केल्यास देशातील अनेक राज्यांमध्ये ब्लॅक आऊट जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात फक्त 6 दिवसांचा साठा शिल्लक -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील कोळशावर आधारित थर्मल पॉवर प्लांट्समध्ये 12 एप्रिलपर्यंत फक्त 8.4 दिवसांचा कोळसा शिल्लक होता. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्यात केवळ 6 दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे राज्यातील विजेची मागणी वाढली आहे. यासोबतच त्यांनी कोळशाचा पुरवठा आणि मालगाड्यांमधील गैरव्यवस्थापनासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. (हेही वाचा - Mumbai Local Train: मुंबई रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवा विस्कळीत; उशीर झाल्याने PSI पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला)
कोळशाचा साठा नऊ वर्षांच्या नीचांकी पातळीवर -
मीडिया रिपोर्टनुसार, भारतात उन्हाळा सुरू होताच देशातील पॉवर प्लांटमधील कोळशाचा साठा नऊ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कोळशाचा साठा कमी होण्यामागे, कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर, औद्योगिक क्रियाकलाप वाढल्यानंतर विजेच्या वापरात मोठी वाढ झाली आहे. तथापि, 2021-22 या आर्थिक वर्षात वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा 24.5 टक्क्यांनी वाढून 6.776.7 दशलक्ष टन झाला असल्याचा दावाही सरकारी आकडेवारीत करण्यात आला आहे.
2020-21 मध्ये कोळशाचा पुरवठा 231.8 लाख टनांनी कमी -
दुसर्या अहवालात असेही निदर्शनास आले आहे की, देशात कोळशाचा पुरवठा वाढला असूनही वाढत्या ऊर्जेच्या मागणीमुळे विविध औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये इंधनाची कमतरता आहे. सरकारी आकडेवारीनुसार, औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये 2020-21 या आर्थिक वर्षात 5,440.7 लाख टन कोळशाचा पुरवठा झाला होता, जो आर्थिक वर्ष 2019-20 मधील 5,672.5 लाख टनांपेक्षा कमी आहे.
मात्र, गेल्या महिन्यात वीज क्षेत्राला कोळशाचा पुरवठा वाढून 653.6 लाख टन झाल्याचा दावाही सरकारी आकडेवारीत केला जात आहे. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते 579.7 लाख टन होते. कोळशाचा एकूण पुरवठा 2020-21 या आर्थिक वर्षातील 6,913.9 लाख टनांवरून 2021-22 या आर्थिक वर्षात 8,181.4 लाख टनांपर्यंत वाढला आहे.
'या' राज्यांमध्ये वीज संकट गडद -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, थर्मल पॉवर प्लांट्समध्ये कोळशाच्या कमतरतेमुळे, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणामध्ये वीज संकट अधिक गडद झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या आठवडाभरात 1.4 टक्के वाढ झाल्याने वीज संकट अधिक गडद झाले आहे. हा आकडा ऑक्टोबरमधील वीज संकटाच्या काळात मागणीपेक्षा अधिक आहे. ऑक्टोबरमध्ये कोळशाच्या भीषण संकटाच्या काळात विजेची मागणी एक टक्क्याने वाढली होती. मात्र, मार्चमध्ये विजेच्या मागणीत 0.5 टक्क्यांची घट झाली आहे.