'पुलवामा हल्ला हा पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट' माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांचा आरोप
यात सीआरपीएफेच 40 जवान मारले गेले. ही घटना घडल्यानंतर देशावरील असा कोणताच हल्ला आपण सहन करणार नाही, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यानंतर भारतीय लष्कराच्या हवाई दलाने 12 दिवसांनंतर मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील बालटोक येथे एअर स्ट्राईक केला. येथे असलेले दहशतवाद्यांचे तळ लष्कराने मोठ्या प्रमाणावर उदद्ध्वस्त केले.
Lok Sabha Elections 2019: पुलवामा दहशतादी हल्ल्यावरुन आता राजकारण चांगलेच तापले आहे. मिझोराम राज्याचे माजी राज्यपाल (Ex-Mizoram Governor) आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अजीज कुरैशी (Aziz Qureshi) यांनी तर पुलवामा हल्ला (Pulwama Attack)म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी घडवून आणलेला पूर्वनियोजित कटच असल्याचा धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपण पुलवामा हल्ला तर घडवून आणला. मात्र, 42 जवाानांची हत्या करुन त्यांच्या मृत्यूचे आपण राजकीय भांडवल म्हणून वापर करत असाल तर जनता ते तुम्हाला करु देणार नाही, असेही कुरैश यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही म्हटले आहे की, लष्कर आणि जवान यांना राजकारणापासून नेहमीच दूर ठेवण्यात आले आहे. मात्र, या देशात गेल्या 70 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच लष्कराचा वापर हा राजकारणासाठी केला जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लष्कराला ही मोदी सेना आहे म्हणतात. अशा प्रकारच्या वक्तव्यावर खरे तर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. (हेही वाचा, मानखुर्द येथे भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा)
एएनआय ट्विट
एएनआय ट्विट
जैश-ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येथील अवंतीपोरा या ठिकाणी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला. यात सीआरपीएफेच 40 जवान मारले गेले. ही घटना घडल्यानंतर देशावरील असा कोणताच हल्ला आपण सहन करणार नाही, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यानंतर भारतीय लष्कराच्या हवाई दलाने 12 दिवसांनंतर मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमधील बालटोक येथे एअर स्ट्राईक केला. येथे असलेले दहशतवाद्यांचे तळ लष्कराने मोठ्या प्रमाणावर उदद्ध्वस्त केले.