Uttarakhand Assembly Elections 2022: महाराष्ट्राचे राज्यपाल BS Koshyari यांच्या नातेवाईक Maya Koshyari यांचा निवडणूकीपूर्वी BJP ला रामराम ठोकत कॉंग्रेस मध्ये प्रवेश
पूर्व महामंत्री दीपा बोरा, मंत्री सुमन बोरा व कार्यकारिणी सदस्य किरन बिष्ट यांचा समावेश आहे.
भारतामध्ये 5 राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरू आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर काहींचा एका पक्षातून दुसर्या पक्षामध्ये प्रवेश सुरू झाला आहे. उत्तराखंड मध्येही आता विधानसभा निवडणूकीपूर्वी माजी उत्तराखंड मुख्यमंत्री आणि विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या नातेवाईकांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. Bindukhatta Bhartiya Janta Party (BJP) Mahila Morcha च्या दोन वेळेस अध्यक्ष असलेल्या माया कोश्यारींनी भाजपाला आता विधानसभा निवडणूकीपूर्वी रामराम ठोकला आहे. नक्की वाचा: Assembly Elections 2022 Dates: उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा च्या विधानसभा निवडणूका 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान; 10 मार्चला निकाल .
माया कोश्यारी भाजपा मधून कॉंग्रेस पक्षामध्ये आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि Lalkuan चे कॉंग्रेसचे उमेदवार Harish Rawat यांच्या उपस्थितीमध्ये माया कोश्यारींनी पक्षप्रवेश केला आहे. जानेवारी महिन्यात पूर्वी भाजपा मधील मंत्री Harak Singh Rawat यांनी देखील कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान उत्तराखंड मध्ये माया कोश्यारींच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर भाजपाला मिळालेला दुसरा मोठा धक्का आहे. माया कोश्यारींसोबत 6 पूर्व पदाधिकार्यांनीही भाजपाला रामराम केला आहे. पूर्व महामंत्री दीपा बोरा, मंत्री सुमन बोरा व कार्यकारिणी सदस्य किरन बिष्ट यांचा समावेश आहे.
उत्तराखंड मध्ये 14 फेब्रुवारीला विधानसभा निवडणूक मतदान होणार आहे त्यापूर्वी आता शेवटचे काही उरले असताना मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत. उत्तराखंड मध्ये लालकुआं विधानसभा सीट सध्या राज्यातील हॉट सीट बनली आहे. कॉंग्रेस आणि भाजपा दोन्हींसाठी ही प्रतिष्ठेची जागा बनत आहे.